वाचा-
सध्याच्या घडीला क्रिकेटपुढे मोठा प्रश्न असेल तो गोलंदाजांचा. कारण गोलंदाज हे चेंडूला लकाकी आणण्यासाठी लाळ वापरतात. चेंडूला लकाकी आली तर गोलंदाजाचा त्याचा चांगलाच फायदा होत असतो. पण आता करोना व्हाय़रसनंतर चेंडूला अशी लकाकी आणणे योग्य नसेल आणि ते सुरक्षितही नाही, असे मत बऱ्याच क्रिकेटपटूंनी व्यक्त केले आहे. कारण जर एखादा गोलंदाज करोनाने बाधित असेल किंवा त्याला अन्य काही आजार असेल तर त्याचा प्रसार लवकर होऊ शकतो.
वाचा-
चेंडूला लकाकी आणण्यासाठी लाळेचा वापर टाळायचा असेल तर गोलंदाजांनी मास्क वापरायला हवा, असे मत पाकिस्तानचा माजी कर्णधार मिसबाह उल हकने व्यक्त केले आहे. पण मास्क लावून खेळणे खेळाडूंसाठी सुरक्षित असेल का, याचा विचार आता काही आजी-माजी क्रिकेटपटू करताना दिसत आहेत. कारण खेळाडूंची मैदानात धावपळ सुरु असते, अशामध्ये जर मास्क लावलेला असेल तर खासकरून गोलंदाजाला काही समस्या जाणवू शकतात.
भारताचा माजी वेगवान गोलंदाज अजित आगरकरने याबाबत सांगितले की, ” आता क्रिकेट सुरु झाल्यावर गोलंदाजांनी मास्क वापरावे, अशी कल्पना पुढे येत आहे. मास्क घालून गोलंदाजी करणे हे खेळाडूसाठी सुरक्षित असेल का, हे डॉक्टरांना विचारावे लागेल. पण माझ्यामते गोलंदाजासाठी मास्क लावून खेळणे सुरक्षित नसेल. कारण मास्क लावून जर गोलंदाजी केली तर त्याला गोलंदाजाच्या छातीमध्ये दुखू शकते किंवा त्याला श्वास घ्यायला त्रास जाणवू शकतो.”
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times