सध्याच्या घडीला एक अजब गोष्ट पाहायला मिळत आहे. भाजपाच्या एका खासदाराने भारताचा कर्णधार विराट कोहलीला आपल्या पत्नीला घटस्फोट देण्याची मागणी केली आहे. पण असं नेमकं घडलंय तरी काय, हा प्रश्न सर्वांना पडलेला आहे. कारण अनुष्काने असे कोणते काम केले आहे की, जेणेकरून तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून तिला देशद्रोही ठरवले जात आहे. हे प्रकरण नेमके आहे तरी काय, जाणून घेऊया…

या भाजपाच्या खासदाराने कोहलीची पत्नी अनुष्का शर्माच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अनुष्काने राष्ट्रद्रोह केला आहे. त्यामुळे कोहलीने पत्नी अनुष्काला घटस्फोट द्यावा, अशी मागणी एका भाजपाच्या खासदाराने केली आहे.

नेमके घडले तरी काय…अनुष्का शर्मा बॉलीवूडमधील अभिनेत्री आहे. त्याचबरोबर ती आता निर्मातीही बनलेली आहे. सध्याचा घडीला पाताललोक या वेब सीरीजची निर्मिती केली आहे. ही वेब सीरीज जेव्हापासून प्रदर्शित करण्यात आली आहे तेव्हापासून ती प्रकाशझोतात आहे. आता या वेब सीरीजमध्ये अशी एक गोष्ट दाखवण्यात आली आहे की, भाजपाचे खासदार चांगलेच भडकेलेले पाहायला मिळत आहेत.

या वेब सीरीजमध्ये एका खासदाराचा फोटो वापरण्यात आला आहे. हा फोटो भाजपाचे खासदार नंदकिशोर गुर्जर यांचा आहे. त्यामुळे नंदकिशोर गुर्जर यांनी अनुष्का शर्माच्या विरोधात पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. त्याचबरोबर नंदकिशोर गुर्जर यांनी अनुष्कावर देशद्रोहचा आरोपही लावला आहे. नंदकिशोर गुर्जर एवढ्यावरच थांबलेले नाहीत, तर त्यांनी विराट कोहलीकडे अनुष्काला घटस्फोट देण्याची मागणीही केली आहे.

नंदकिशोर गुर्जर हे उत्तर प्रदेशच्या लोनी शहरातील आहे. या वेब सीरिजमध्ये बालकृष्ण वाजपेयी हे एक पात्र आहे. या वेब सीरिजमधील निगेटीव्ह भूमिका करणाऱ्या पात्राकडे नंदकिशोर गुर्जर यांचा फोटो असल्याचे दाखवले गेले आहे. त्यामुळे नंदकिशोर गुर्जर चांगलेच भडकलेले असून ते याबाबत न्यायालातही धाव घेऊ शकतात, असे म्हटले जात आहे.
(हे वृत्त दैनिक जागरण या वेबसाईटने दिलेले आहे.)

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here