ऑस्ट्रेलियातील प्रसारमाध्यमांनी आज एक बातमी प्रकाशित केली आहे. त्यानुसार क्रिकेट ऑस्ट्रेलियाने भारताच्या दौऱ्याच्या तारखाही ठरवलेल्या आहेत. ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यात भारतीय संघ चार कसोटी सामने खेळणार आहे. या मालिकेला ३ डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. भारताचा पहिला सामना ब्रिस्बेन येथे खेळवण्यात येणार आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा कसोटी सामना हा डे-नाइट खेळवण्यात येणार आहे. हा सामना अॅडलेडच्या मैदानावर खेळवण्यात येणार आहे. त्यानंतर बॉक्सिंग डे टेस्टही यावेळी खेळवली जाणार आहे. हा कसोटी सामना मेलबर्न येथे खेळवला जाणार आहे. या दौऱ्यातील अखेरचा सामना हा पुढच्या वर्षातील पहिला सामना असेल. कारण हा सामना ३ जानेवारी २०२१ या दिवशी सिडनी येथे खेळवला जाणार आहे.
ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यात जेव्हा भारताचा संघ येईल, तेव्हा त्यांनी एक कसोटी सामना डे-नाइट खेळायला हवा, अशी मागणी ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट मंडळाने बीसीसीआयला केली होती. त्यावेळी बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी यावर विचार करण्याचे ठरवले होते. ही गोष्ट आता प्रत्यक्षात येऊ शकते, असे दिसत आहे. कारण या गोष्टीवर दोन्ही क्रिकेट मंडळाचा निर्णय झाला असावा, त्यामुळे दुसरा कसोटी सामना डे-नाइट खेळवण्यात येईल, हे ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट मंडळाने जाहीर केले नसते. त्यामुळे डे-नाइट कसोटी सामना खेळवण्याबाबत चर्चा झाल्यानंतरच ही लढत ठरवण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी डे-नाइट कसोटी सामन्यांना गांगुली हे सकारात्मक प्रतिसाद देतील, असे ऑस्ट्रेलिया क्रिकेट मंडळाच्या अधिकाऱ्यांनी आणि काही खेळाडूंनीही सांगितले होते. त्यानुसार ही गोष्ट घडली असावी.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेचे वेळापत्रक३ डिसेंबर २०२०- ब्रिस्बेन
११ डिसेंबर २०२०-अॅडलेड
२६ डिसेंबर २०२० – मेलबर्न
३ जानेवारी २०२१- सिडनी
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times