Asia Cup : आशिया खंडातील देशांसाठी विश्वचषकानंतर एक अत्यंत भव्य क्रिकेट स्पर्धा म्हणजे आशिया कप. दरम्यान यंदाच्या आशिया कप 2022 (Asia Cup 2022) साठी भारताने आपला संघ काही दिवसांपूर्वी जाहीर केला. यावेळी काही खेळाडूंना संघात स्थान मिळालं नसल्याचंही समोर आलं आहे. अशामध्ये युवा यष्टीरक्षक फलंदाज ईशान किशन (Ishan Kishan) याचंही नाव संघात नसल्याने तो निराश झाल्याचं त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या स्टोरीतून दिसून आलं आहे.

ईशानने त्याचा एक सरावादरम्याचा फोटो शेअर करत त्यासोबत एक गाणं लावलं, ज्या गाण्याचे शब्दही स्टोरीत दिसून येत आहेत. ज्या शब्दातून ईशान जणू आपलं दु:ख व्यक्त करत असल्याचं दिसून येत आहे. थोडक्यात या गाण्याचा अर्थ म्हटलं तर ‘तुला आता कणखर व्हायचं आहे, त्यासाठी जखमी व्हावं लागलं तरी चालेल. तुला कोणी फुल समजेल तर तू आग हो’, दरम्यान अशा अर्थातून ईशान आगामी काळात आणखी मेहनत करुन संघात पुनरागमन करण्याच्या तयारीत असल्याचं दिसून येत आहे.

ईशानची स्टोरी-

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने (BCCI) स्पर्धेसाठीचा भारतीय संघ जाहीर केला. यावेळी रोहित शर्मा कर्णधार तर केएल राहुल उपकर्णधार असणार आहे. विशेष म्हणजे दुखापतीमुळे अनुभवी गोलंदाज जसप्रीत बुमराह स्पर्धेला मुकणार आहे. विराटलाही संघात संधी मिळाली असून नेमकी टीम कशी आहे पाहूया…

कसा आहे भारतीय संघ?

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, रवींद्र जाडेजा, रवीचंद्रन आश्विन, युजवेंद्र चहल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंह, आवेश खान. 

राखीव – दीपक चाहर, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल

अनुभवी खेळाडूंनाही डच्चू 

भारतीय संघाचा विचार करता यामध्ये काही दिग्गज खेळाडूंना डावलण्यात आलं आहे. ज्यामध्ये सलामीवीर शिखऱ धवन, गोलंदाज मोहम्मद शमी यांचा समावेश आहे. शिखर मागील काही काळापासून फॉर्ममध्ये आहे. आयपीएलमध्येहील त्याने चांगली कामगिरी केली. पण तरीही त्याला सलामीवीर म्हणून संघात स्थान मिळालं नाही. याशिवाय मोहम्मद शमीसारखा अनुभवी गोलंदाजही संघात नसल्याचं दिसून आलं आहे. बुमराह दुखापतीमुळे बाहेर असल्याने अनुभवी गोलंदाज म्हणून भुवनेश्वर कुमारच संघात आहे. तसंच ईशान किशनसोबत संजू सॅमसन यालाही संधी मिळालेली नाही. दीपक हुडाला मात्र संघात स्थान मिळालं आहे.

हे देखील वाचा-sports

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here