जोपर्यंत स्पर्धांना सुरुवात होत नाही तोपर्यंत क्रिकेट मंडळांचे उत्पन्न सुरु होऊ शकणार नाही. सध्याच्या घडीला जवळपास सर्वच देशांमध्ये लॉकडाऊन सुरु आहे. त्यामुळे क्रिकेट स्पर्धा होताना दिसत नाही. या परिस्थितीत जर संघटना चालवायची असेल तर त्यासाठी काही गोष्टी कराव्या लागणार आहे. त्यामुळे सध्याच्या घडीला क्रिकेट मंडळाने आपल्या स्टाफचा पगार १०-१५ टक्क्यांनी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. या कपातीमधून जी रक्कम वाचणार आहे, तिचा उपयोग संघटना टिकवण्यासाठी करण्यात येणार आहे. कारण जोपर्यंत क्रिकेट स्पर्धा सुरु होत नाही तोपर्यंत क्रिकेट मंडळाचे उत्पन्न सुरु होऊ शकणार नाही, त्यामुळे उत्पन्न सुरु होईपर्यंत ही कपात सुरु राहू शकते.
न्यूझीलंडच्या क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष डेव्हिड व्हाइट यांनी सांगितले की, ” सध्याच्या घडीला क्रिकेट मंडळावर वाईट परिस्थिती आली आहे. त्यामुळे आम्ही आमच्या स्टाफचा पगार कापण्याचे ठरवले आहे. ही पगार कपात करून आम्ही ६० लाख डॉलर एवढी रक्कम वाचवणार आहोत. ही रक्कम आम्ही कापली की स्थानिक क्रिकेट क्लब, खेळाडू आणि खेळाशी निगडीत असलेल्या व्यक्तींवर कोणतीही समस्या येऊ देणार नाही. कारण त्यांचा पगार आम्ही कापणार नाही.”
न्यूझीलंडचा संघ सध्या एकही सामना खेळताना दिसत नाही. न्यूझीलंड ऑक्टोबर महिन्यात ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाणार होता. पण जर हा दौरा रद्द करण्यात आला तर न्यूझीलंडच्या क्रिकेट मंडळाला मोठे नुकसान सोसावे लागू शकते. न्यूझीलंड जरी या दौऱ्यावर जाणार असली तरी सामने प्रेक्षकांविनाच खेळावे लागणार आहेत. कारण करोनामुळे सुरक्षिततेचा उपाय सर्वांनाच घ्यावा लागणार आहे. त्यासाठी या सामन्यांमध्ये प्रेक्षकांना पाहण्याची परवानगी नसेल. पण
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times