मुंबई: प्रत्येक गोलंदाजाचे स्वप्न असते की त्याने करिअरमध्ये एकदा तरी हॅटट्रिक घ्यावी. परंतू अनेक गोलंदाजांचे हे स्वप्न अपूर्णच राहते. क्रिकेटमध्ये काही गोलंदाज असे आहेत ज्यांनी एका पेक्षा अधिक वेळा हॅटट्रिक घेण्याचा पराक्रम केला आहे. पण असा एक गोलंदाज होऊन गेला आहे ज्याने हॅटट्रिक बाबत केलेला विक्रम पुन्हा कधी झाला नाही.

वाचा-
एखाद्या गोलंदाजाने हॅटट्रिक घेतली तर तुम्ही म्हणाल त्यात काय फार विशेष नाही. तर कसोटीतील दोन्ही डावात अशी कामगिरी केली तर तुम्ही संबंधित गोलंदाजाचे नक्कीच कौतुक कराल. पण एखाद्या गोलंदाजाने एकाच दिवशी दोन वेळा हॅटट्रिक घेतील असे सांगितले तर? होय क्रिकेटच्या इतिहासात फक्त एकदा झालेल्या या घटनेबद्दल आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

वाचा-
ऑस्ट्रेलियाचा लेग स्पिनर यांनी फक्त ८ कसोटी सामने खेळले. १९१२ साली ते क्रिकेट खेळले. त्याचे एकूण करिअर फक्त १२६ दिवसांचे होते. पण इतक्या छोट्या करिअरमध्ये त्यांनी अशी कामगिरी केली जी क्रिकेटमध्ये पुन्हा कोणाला करता आली नाही.

आजच्या दिवशी म्हमजे २८ मे १९१२ रोजी ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात कसोटी सामना सुरू होता. ही कसोटी मालिका तीन देशांच्यात सुरू होती आणि तिसरा संघ इंग्लंड होता. आफ्रिकेविरुद्धच्या या सामन्यता ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करत ४४२ धावा केल्या. उत्तरा दाखल आफ्रिकेने पहिल्या डावात २५६ तर दुसऱ्या डावात फक्त ९५ धावा केल्या.

वाचा-

ऑस्ट्रेलियाकडून जिमी मॅथ्यूज यांनी एकाच दिवशी दोन वेळा हॅटट्रिक घेतली. विशेष म्हणजे जिमी यांनी फिल्डरची मदत न घेता हॅटट्रिक घेतली. त्यांनी घेतलेल्या सहा विकेटपैकी दोन बोल्ड, दोन स्वत: कॅच आणि दोघांना LBW होत्या.

या सामन्यात जिमी यांनी सहा विकेट घेतल्या आणि त्या सर्व हॅटट्रिक विकेट होत्या. ही कामगिरी त्यांनी एकाच दिवसात केली. या दोन्ही डावात जिमी यांच्या हॅटट्रिकमधील दुसरी विकेट टोनी वार्ड यांची होती. वार्ड दोन्ही डावात पहिल्याच चेंडूवर बाद झाले.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here