क्रीडा चाहत्यांसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. एका खेळाडूच्या फक्त एका महिन्याच्या चिमुकलीचे निधन झाले आहे. या वृत्तानंतर क्रीडा क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.

UFC या बॉक्सिंगच्या स्पर्धेत खेळत होता. पण काही दिवसांपूर्वी त्याने निवृत्ती घेतली होती. महिन्याभरापूर्वी सॅमला कन्यारत्न झाले होते. त्यावेळी सॅमचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. सॅमने आपल्या मुलीसोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअरही केला होता. पण एका महिन्यात सॅमच्या आयुष्यात ही वाईट गोष्ट घडली आहे.

सॅमने आपल्या मुलीचे नाव सिडनी लव्ह स्टाऊट, असे ठेवले होते. काल रात्री झोपेतच तिचे निधन झाले. त्यामुळे सॅम आणि त्याच्या पत्नीवर आता दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

आम्ही सिडनीला वाचवण्याचे भरपूर प्रयत्न केले, पण अखेर त्यामध्ये आम्ही अपयशी ठरलो. झोपेतच सिडनीचे निधन झाले. गेला एक महिना मी तिच्या सानिध्यात होतो. तिच्याबरोबर व्यतित केलेला वेळ माझ्यासाठी अविस्मरणीय असाच असेल. सध्याच्या घडीला मी आणि माझी पत्नी शोक सागरात बुडालेलो आहोत, असे सॅमने सांगितले आहे.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here