भारत ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी मालिका खेळणार असल्याचे वृत्त काल आले होते. पण भारत वने आणि ट्वेन्टी-२० मालिका खेळणार की नाही, हे समजू शकले नव्हते. पण आता वनडे आणि ट्वेन्टी-२० मालिकाही दोन्ही देशांमध्ये होणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.
वाचा-
भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याची सुरुवात ट्वेन्टी-२० मालिकेने होणार आहे. दोन्ही देशांमध्ये तीन सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे. पहिला सामना ११ ऑक्टोबरला होणार आहे. त्यानंतरचे दोन ट्वेन्टी-२० सामने अनुक्रमे १४ आणि १७ ऑक्टोबरला होणार आहेत. या तारखा विश्वचषक झाल्यास कायम राहतील. जर विश्वचषक रद्द करण्याचा निर्णय करण्यात आला तर या तारखाही बदलण्यात येतील.
वाचा-
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये तीन वनडे सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे. ही मालिका सर्वात शेवटी असेल. ट्वेन्टी-२०, कसोटी आणि त्यानंतर वनडे मालिका खेळवण्यात येणार आहे. पहिला वनडे सामना १२ जानेवारला होणार आहे. त्याचबरोबर अन्य दोन सामने १५ आणि १७ जानेवारीला खेळवण्यात येणार आहे.
ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यात भारतीय संघ चार कसोटी सामने खेळणार आहे. या मालिकेला ३ डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. भारताचा पहिला सामना ब्रिस्बेन येथे खेळवण्यात येणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा कसोटी सामना हा डे-नाइट खेळवण्यात येणार आहे. हा सामना अॅडलेडच्या मैदानावर खेळवण्यात येणार आहे. त्यानंतर बॉक्सिंग डे टेस्टही यावेळी खेळवली जाणार आहे. हा कसोटी सामना मेलबर्न येथे खेळवला जाणार आहे. या दौऱ्यातील अखेरचा सामना हा पुढच्या वर्षातील पहिला सामना असेल. कारण हा सामना ३ जानेवारी २०२१ या दिवशी सिडनी येथे खेळवला जाणार आहे.
भारताच्या ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्याचे संपूर्ण वेळापत्रक
ट्वेन्टी-२० मालिका
११ ऑक्टोबर- ब्रिस्बेन
१४ ऑक्टोबर- कॅनबेरा
१७ ऑक्टोबर- अॅडलेड
कसोटी मालिका
३ डिसेंबर २०२०- ब्रिस्बेन
११ डिसेंबर २०२०-अॅडलेड
२६ डिसेंबर २०२० – मेलबर्न
३ जानेवारी २०२१- सिडनी
वनडे मालिका
१२ जानेवारी- पर्थ
१५ जानेवारी- मेलबर्न
१७ जानेवारी- सिडनी
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times