करोना व्हायरसमुळे क्रीडा स्पर्धा स्थगित कराव्या लागल्या होत्या. त्यामुळे चाहत्यांचा हिरमोड झाला होता. पण चाहत्यांसाठी आता एक आनंदाची बातमी समोर आली आहे. कारण आता १७ जूनपासून प्रीमिअर लीग सुरु करण्यात येणार आहे. त्यामुळे आता लाइव्ह सामन्यांचा आनंद चाहत्यांना घेता येणार आहे. प्रीमिअर लीगमधील खेळाडूंची करोना चाचणी करण्यात आली होती. यावेळी २७५२ खेळाडूंची करोना चाचणी करण्यात आली होती. २७५२ खेळाडूंपैकी १२ खेळाडूंना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. पण त्यानंतही ही लीग १७ जूनपासून खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

करोना व्हायरसमुळे जवळपास सर्वच देशात लॉकडाऊन सुरु आहे. भारतामध्ये चौथे लॉकडाऊन सुरु झाले आहे आणि ३१ मेपर्यंत हे सुरु राहील. चौथ्या लॉकडाऊनमध्ये भारातामध्येही क्रीडा क्षेत्राला मुभा देण्यात आली होती. त्यामुळे आता भारतामध्येही क्रीडा सरावाला सुरुवात झाल्याचे पाहायला मिळत आहे त्यामुळे आता काही खेळाडू मैदानात उतरून सराव करत असल्याचे पाहायला मिळत आहे.

ब्रिटीश मीडियाने दिलेल्या एका अहवालानुसार आता १७ जूनपासून प्रीमिअर लीग फुटबॉल स्पर्धा पुन्हा सुरु करण्यात येणार आहे. ९ मार्चला या लीगचा अखेरचा सामना झाला होता. हा सामना लिस्टर आणि अॅस्टॉन व्हिला यांच्यामध्ये झाला होता. या सामन्यात लिस्टरने अॅस्टॉन व्हिला संघावर ४-० असा दणदणीत विजय मिळवला होता.

आसीसीने ट्वेन्टी-२० विश्वचषकाबाबत सावध पाऊल उचलले आहे. कारण एवढ्या लवकर ट्वेन्टी-२० विश्वचषकाबाबत घाई करून निर्णय घेतला जाऊ नये, असे त्यांना वाटत आहे. त्यामुळे आजच्या बैठकीत ट्वेन्टी-२० विश्वचषकावर चर्चा करण्यात आली. पण ट्वेन्टी-२० विश्वचषकाबाबतचा निर्णय त्यांनी १० जूनपर्यंत पुढे ढकलला आहे. आता १० जूनला आयसीसीची एक बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये ट्वेन्टी-२० विश्वचषकाबाबत अंतिम निर्णय घेतला जाऊ शकतो, असे म्हटले जात आहे. करोना व्हायरसमुळे ट्वेन्टी-२० विश्वचषकही रद्द होण्याच्या मार्गावर असल्याचे म्हटले जात आहे. याबाबत आज निर्णय येणे अपेक्षित होते. पण आयीसीने याबाबतचा निर्णय आता १० जूनपर्यंत पुढे ढकलला आहे.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here