नवी दिल्ली: क्रिकेट प्रकारात शतक झळकावणे ही अवघड गोष्ट असते. कारण संपूर्ण संघाला मिळून १२० चेंडू मिळतात. त्यामुळे एका खेळाडूला शतक करण्यासाठी त्याला पहिल्या चेंडूपासून आक्रमक खेळ करावा लागतो. असे असून देखील अनेक खेळाडू शतकाच्या जवळ पोहोचतात पण ते पूर्ण होत नाही.

वाचा-
आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये आतापर्यंत १ हजारहून अधिक सामने झाले आहेत. या सर्व सामन्यात मिळून फक्त एकदाच असे झाले आहे की खेळाडू ९९ धावांवर बाद झाला. तर अन्य एक खेळाडू ९९ धावांवर नाबाद राहिला. विशेष म्हणजे हे दोन्ही खेळाडू एकाच संघाचे आहेत. एक सलामीवीर तर दुसरा अष्ठपैलू, सध्या हे दोन्ही खेळाडू संघा बाहेर आहेत.

टी-२० मध्ये ९९ धावांवर बाद होणारा एकमेव खेळाडू म्हणजे इंग्लंडचा होय. तर हा असा एकमेव खेळाडू आहे जो टी-२०मध्ये ९९ धावांवर नाबाद राहिला.

२०१२ साली वेस्ट इंडिजविरुद्ध १७३ धावांचा पाठलाग करताना हेल्सने ६७ चेंडूत ९९ धावा केल्या. या खेळीत त्याने ६ चौकार आणि ४ षटकार मारले होते. तर त्याचा स्ट्राइकरेड १४५.५८ इतका होता. राइटने ऑस्ट्रेलियाविरुद्ध नाबाद ९९ धावा केल्या. अखेरच्या चेंडूवर शतक करण्यासाठी त्याला ३ धावांची गरज होती. पण तो दोन धावा करू शकला.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नर्व्हस नाईटी म्हणजे ९० ते ९९ या धावसंख्येत बाद झालेल्यामध्ये अव्वल स्थानी भारताचा सचिन तेंडुलकर. तो १७ वेळा कसोटीत तर १० वेळा वनडेत नर्व्हस नाईटीमध्ये बाद झाला आहे.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here