नवी दिल्ली: फक्त चित्रपटात नव्हे तर प्रत्यक्षात देखील हिरो असणारे फार कमी स्टार असतात. अभिनेता सोनू सूदने लॉकडाऊनच्या काळात संकटात अडकलेल्या लोकांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. जे कामगार विविध राज्यात अडकले आहेत त्यांना त्याच्या घरी पोहोचवण्याचे काम करत आहे. यासाठी सोशल मीडियावरून नेटिझन्स त्याला सलाम करत आहेत.

वाचा-

अनेक क्रिकेटपटूनीं सोनू सूदचे कौतुक केले आहे. आयपीएलमधील (KXIP)ने मुन्ना भाईच्या स्टाइलमध्ये सोनू सूदला सलम केला आहे. पंजाबने केलेल्या ट्वीटमध्ये ते म्हणतात, तुम बहुत मस्त काम करता है सोनू भाई.

किंग्ज इलेव्हन पंजाबचे हे ट्वीट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जेव्हापासून सोनू सूदने कामगारांची मदत करण्यास सुरुवात केली आहे तेव्हापासून तो सोशल मीडियावर चर्चेत आला आहे.

अनेक नेटिझन्सनी सोशल मीडियावर सोनू सूदच्या कामासाठी त्याचे कौतुक केले. काहींनी त्याच्यावर कविता लिहली आहे. कामगारांना त्यांच्या घरी पोहोचवण्यात सोनू सूदची मैत्रीण निती गोएल देखील त्याला मदत करत आहे. फक्त उत्तर प्रदेश आणि कर्नाटक नाही तर केरळमधील एर्नाकुलम येथे अडकलेल्या १७७ मुलांना एअरलिफ्टकडून भुवनेश्वर येथे पोहोचवण्यात आले.

सोनूने आतापर्यंत हजारो प्रवासी मजूरांना त्यांच्या घरी पाठवले आहे. अजूनही तो अहोरात्र त्यांची मदत करत आहेत. बॉलिवूड जगतातून त्याच्या या कामाचं कौतुक होत असून अनेकांनी आता त्याला मदतीचा हात देऊ केला आहे. जो पर्यंत शेवटचा मजूर त्यांच्या घरी जात नाहीत तो पर्यंत हे काम सुरुच ठेवणार; असा निश्चयच सोनूनं केला आहे. इतकंच नव्हे तर आता तो विद्यार्थ्यांच्या मदतीला देखील धावला आहे. याच त्याच्या उद्दात कार्यामुळे सर्व स्थरावरून त्याचं कौतुक होत आहे.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here