मुंबई: भारताचा मास्टर ब्लास्टर आणि वेस्ट इंडिजचा महान फलंदाज यांची तुलना नेहमी केली जाते. चाहते आणि समालोचक जरी या दोघांची तुलना करत असले तरी मैदानाबाहेरील या दोघांची मैत्री सर्वांना माहित आहे. सचिन आणि लारा यांनी नेहमीच एकमेकांचे कौतुक केले. सध्या लॉकडाऊनमुळे हे दोघेही सोशल मीडियावर सक्रीय आहेत.

वाचा-

लाराने त्याच्या मुलाचा फोटो इस्टाग्रामवर शेअर केला होता. लाराने हा फोटो शेअर करताना सचिन तेंडुलकरचा लहानपणाचा फोटो सोबत जोडला होता. आता लाराचा हा फोटो सचिन तेंडुलकरने देखील शेअर केला आहे. या दोन्ही दिग्गज खेळाडूंनी शेअर केलेल्या खास अशा फोटोची चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट करून या फोटोवर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

वाचा-

लाराच्या मुलाची स्टाइल सचिनच्या लहानपणीच्या फोटसारखी आहे. लाराने फोटो शेअर केल्यानंतर सचिनने देखील लगेच त्याला उत्तर दिले. या फोटोतील फरक म्हणजे सचिनचे केस थोडे मोठे आहेत आणि कपड्यातील फरक होय. लाराने त्याच्या सोशल मीडियावर मुलाचा क्रिकेट खेळत असलेला एक व्हिडिओ शेअर केला आहे.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

1 COMMENT

  1. I really love to read such an excellent article. Helpful article. Hello Administ . Dünyanın her yerinden kalite puanı yüksek sitelerden hacklink almak için bizimle iletişim kurabilirsiniz. Hacklink ihtiyaçlarınledebilirsiniz.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here