वाचा-
भारतीय संघातील माजी स्फोटक फलंदाज विरेंद्र सेहवागने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटो संपूर्ण सेहवाग कुटुंबीय प्रवासी मजूरांसाठी जेवण तयार करून ते पॅक करत आहे. सेहगाने हा फोटो शेअर करताना अन्य लोकांना मदत करण्याचे आवाहन केले. सेहवागच्या या प्रयत्नांचे आणि आवाहनाचे सर्व जण कौतुक करत आहेत.
वाचा-
प्रवासी मजूरांसाठी सेहवागने ‘घर से सेवा’ नावाचे अभियान सुरू केले. लॉकडाऊनमुळे प्रवासी मजूरांना घरची वाट धरावी लागत आहे. अशा लोकांसाठी सेहवाग मदत करत असून त्यात आई कृष्णा, पत्नी आरती आणि आर्यवीर, वेदांत ही दोन मुले मदत करत आहेत.
वाचा-
सेहवाग कुटुंबियांनी प्रवासी मजूरांसाठी घरीच जेवण तयार केले. त्यानंतर ते पॅक करून त्याचे वाटप केले गेले. यासाठी त्याने #GharSeSewa हा हॅशटॅग वापरला आहे. इतक नव्हे तर तुम्ही १०० लोकांचे जेवण तयार करून देणार असाल तर सेहवाग फाउंडेशनशी (@SehwagFoundatn) संपर्क करावा, असे त्याने म्हटले आहे. लोकांना मदत करण्याची सेहवागची ही पहिली वेळ नाही. तो सेहवाग फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक वेळा मदत करत असतो.
वाचा-
शहीद मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी
जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे १४ फेब्रुवारी २०१९ रोजी सीआरपीएफच्या जवानांवर आत्मघाती हल्ला झाला होता. हल्ल्यात ४० जवान शहीद झाले होते. या हल्ल्यातील शहीद झालेल्या दोन जवानांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी सेहवागने घेतली होती. सेहवागने हरियाणात स्वत:ची शाळा सुरू केली आहे. या शाळेला तो नियमीतपणे भेट देत असतो. पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या दोन जवानांच्या मुलांचे शिक्षण याच शाळेत सुरू आहे.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times