करोना व्हायरसमुळे भारतातील क्रीडा स्पर्धा स्थगित करण्यात आल्या आहेत. पण ही देशांमध्ये आता क्रीडा स्पर्धा आयोजित करायला सुरुवात झाली आहे. जर्मनीमध्ये फुटबॉलची बुंदेसलीगा ही लीग सुरु झाली आहे. या लीगचे नियम आपल्याकडे पाळले गेले तर भारतात क्रिकेट पुन्हा सुरु करता येऊ शकते, असे भारताचा माजी फुटबॉल संघाचा कर्णधार बायचुंग भूतियाने सांगितले आहे.

जर्मनीमध्ये १६ मेपासून बुंदेसलीगा सुरु करण्यात आली. ही लीग सुरु करण्यापूर्वी सर्व खेळाडूंची करोना चाचणी करण्यात आली होती. त्यामध्ये काही खेळाडू करोनाबाधित असल्याचेही पुढे आले होते. पण त्यानंतरही जर्मनीने ही लीग खेळवण्याची ठरवली. आता सुरक्षिततेचे सर्व उपाय करत ही लीग सुरु झाली आहे. ही लीग पाहण्यासाठी मोठ्या स्टेडियममध्ये फक्त ३०० चाहत्यांनाच प्रवेश दिला जात आहे. ही लीग सुरु झाल्यानंतर बऱ्याच देशांनी ती पाहिली आहे. त्याचबरोबर या लीगसाठी जे नवीन नियम बनवले गेले आहेत, त्यांचादेखील अभ्यास करणे काही जणांनी सुरु केले आहे.

वाचा-

भूतिया म्हणाला की, ” सध्याची परिस्थिती वाईट आहे, असे काही होईल याचा मी विचारही केला नव्हता. पण आता हळूहळू सारे काही पूर्ववत करायला सुरुवात करायला हवी. आता सरकाने काय नियम आणि अटी ठेवते ते पाहावे लागेल. पण जर बुंदेसलीगा या लीगचे नियम आपण पाळले तर भारतामध्ये क्रिकेट पुन्हा एकदा लवकर सुरु होऊ शकते. पण परिस्थितीनुसार त्यामध्ये काही बदल करावे लागतील. आता यापुढे सामने हे प्रेक्षकांविना खेळवावे लागतील. त्यामुळे खेळाडूंचा मैदानातील जोश थोडा कमी होऊ शकतो.”

भूतिया हा अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या तांत्रिक समितीचा अध्यक्ष आहे. त्यामुळे आता फुटबॉल जर भारतामध्ये सुरु करायचा असेल तर काय करायला हवे, याचा विचार भूतिया करत आहे. याबाबत भूतिया म्हणाला की, ” सध्याच्या घडीला आम्ही परिस्थितीचा अभ्यास करत आहोत. सप्टेंबर महिन्यापासून फुटबॉलच्या मोसमाला सुरुवात होते. त्यामुळे आता या सप्टेंबरमध्ये काय करायचे, याचा विचार सध्या सुरु आहे.”

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here