वाचा-पुजाराच्या अंगात सेहवाग संचारला; गोलंदाजांची बेदम धुलाई, २२ चेंडूत अर्धशतक तर…
देशाला आयसीसीच्या सर्व स्पर्धांचे विजेतेपद मिळवून देणारा धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून २०२० मध्ये निवृत्त झालाय. सध्या धोनी फक्त आयपीएलमध्ये खेळताना दिसतो. धोनीने गेल्या काही वर्षापासून सोशल मीडियावर सक्रिय राहणे सोडून दिले आहे. धोनीने याआधी ५८२ दिवसांपूर्वी इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला होता. त्यानंतर आता त्याने प्रोफाइल फोटो बदलला आहे.
देशात ७५वा स्वातंत्र्यदिन साजरा होत असताना धोनीने त्याचे देशप्रेम खास स्टाइलमध्ये व्यक्त केले. फक्त सोशल मीडियावर नाही तर धोनी क्रिकेटच्या मैदानावर देखील तिरंगा सोबत ठेवतो. धोनीने त्याच्या हेल्मेटवर तिरंगा लावला आहे. १५ ऑगस्ट २०२० रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याआधी त्याने ब्रेक घेतला होता. या दरम्यान त्याने ब्रेक घेऊन भारतीय लष्करासोबत ट्रेनिंग घेतले होते.
वाचा- तुम्ही धोका दिलात; BCCI च्या निर्णयावर चाहते भडकले, जाणून घ्या काय झालं
धोनी हा भारताचा यशस्वी कर्णधार आहे. त्याने टी-२० वर्ल्डकप, वनडे वर्ल्डकप आणि चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद मिळवले आहे. या शिवाय आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जला चार वेळा विजेतेपद मिळून दिले आहे.
वाचा- आम्हाला हलक्यात घेऊ नका; झिम्बाब्वेने दौऱ्याआधीच भारताला दिला धोक्याचा इशारा
२००४ साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या धोनीने भारताकडून ९० कसोटी, ३५० वनडे आणि ९८ टी-२० सामने खेळले आहेत. कसोटीत ३३ अर्धशतक आणि ६ शतकासह ४ जार ८७६ धावा, वनडेत १० हजार धावा केल्या आहेत. यात ७३ अर्धशतक आणि १० शतक आहेत. टी-२०मध्ये त्याने १ हजार ६१७ धावा केल्या आहेत.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times