करोनी व्हायरसचा प्रसार संपूर्ण जगात झालेला आहे. चीनमधून करोनाचा प्रसार सुरु झाला, हे सर्वांनाच माहिती आहे. पण कोणीही चीनवर कारवाई करण्यासाठी पुढे येताना दिसत नाही. भारताचा फिरकीपटू हरभजन सिंग चीनवर चांगलाच भडकलेला पाहायला मिळाला आहे. चीनने करोना पसरवून काय साधले, याचे उत्तर आता हरभजनने दिले आहे.

हरभजनने एक बातमी ट्विट केली आहे. या बातमीमध्ये कालच्या दिववशी चीनमध्ये करोनाचा एकही नवीन रुग्ण सापडला नाही, अशी माहिती देण्यात आली होती. संपूर्ण जग एकाबाजूला करोनाने लढतो आहे, तर दुसरीकडे चीनमध्ये मात्र साधारण परिस्थिती असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुले चीनचा करोना पसरवण्याचा प्लॅन होता, असे हरभजनच्या बोलण्यातून वाटत आहे.

ही बातमी ट्विट करताना हरभजन म्हणाला की, ” करोना व्हायरस जगभरात पसरवण्याचा चीनचा प्लॅन होता. सध्याच्या घडीला संपूर्ण जग करोना व्हायरसमुळे त्रस्त आहे. पण दुसरीकडे चीनमध्ये काहीच परीणाम आता दिसत नाही. आता ते संपूर्ण जगाकडे पाहून हसत असतील. त्याचबरोबर आता आपली अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी ते पीपीई किट्स आणि मास्क बनवून संपूर्ण जगाला विकत आहेत.”

करोना व्हायरसमुळे भारतातील क्रीडा स्पर्धा स्थगित करण्यात आल्या आहेत. पण ही देशांमध्ये आता क्रीडा स्पर्धा आयोजित करायला सुरुवात झाली आहे. जर्मनीमध्ये फुटबॉलची बुंदेसलीगा ही लीग सुरु झाली आहे. या लीगचे नियम आपल्याकडे पाळले गेले तर भारतात क्रिकेट पुन्हा सुरु करता येऊ शकते, असे भारताचा माजी फुटबॉल संघाचा कर्णधार बायचुंग भूतियाने सांगितले आहे.

जर्मनीमध्ये १६ मेपासून बुंदेसलीगा सुरु करण्यात आली. ही लीग सुरु करण्यापूर्वी सर्व खेळाडूंची करोना चाचणी करण्यात आली होती. त्यामध्ये काही खेळाडू करोनाबाधित असल्याचेही पुढे आले होते. पण त्यानंतरही जर्मनीने ही लीग खेळवण्याची ठरवली. आता सुरक्षिततेचे सर्व उपाय करत ही लीग सुरु झाली आहे. ही लीग पाहण्यासाठी मोठ्या स्टेडियममध्ये फक्त ३०० चाहत्यांनाच प्रवेश दिला जात आहे.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here