पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज वकार युनूसने एका पॉर्न क्लिपला लाईक केल्याचे वृत्त चांगलेच व्हायरल झाले होते. त्यामुळे दिवसभर वकार हा ट्रेडिंगमध्ये आला होता. पण खरंच वकारने पॉर्न क्लिपला लाईक केले होते का, जाणून घ्या सत्य…

आज सकाळी वकारने एका पॉर्न क्लिपला लाईक केल्याचे वृत्त वाऱ्यासारखे पसरले होते. वकारसारख्या प्रसिद्ध व्यक्तीने सोशल मीडियावर असे कसे केले, हा प्रश्न सर्वांना पडलेला होता. कारण वकारची छबी जनमानसात चांगली आहे. त्यामुळे वकार असं करू शकेल का, याबाबत अनेकांच्या मनात संभ्रम होता.

जेव्हा वकारला ही गोष्ट समजली तेव्हा त्याची झोपच उडाली. त्यानंतर वकारने एक व्हिडीओ बनवला आणि सोशल मीडियावर शेअर केला. या व्हिडीओमध्ये नेमके काय घडले आहे, हे वकारने सांगितले आहे. वकारने खरंच पॉर्न व्हिडीओला लाईक केले होते का, जाणून घ्या…

नेमके घडले तरी काय…आपण एका पॉर्न व्हिडीओला लाईक केले आहे, हे वकारला एका व्यक्तीने कळवले. वकारने जेव्हा हा सारा प्रकार पाहिला तेव्हा त्याच्या पायाखालील जमिनंच सरकली. नेमके काय करावे, हे वकारला कळत नव्हते. त्यामुळे वकारने एक व्हिडीओ बनवला आणि घडलेला सर्व प्रकार सांगितला. वकार म्हणाला की, ” तुम्हाला जो काही त्रास झाला, त्याबद्दल मी तुम्हा सर्वांनी माफी मागतो. कारण ही पॉर्न क्लिप मी लाईक केलेली नाही. माझे सोशल मीडियावरील अकाऊंट कोणीतरी हॅक केले आणि त्यानंतर हा प्रताप केला आहे.. यापूर्वी २-३ वेळी माझे अकाऊंट हॅक झाले होते. पण तेव्हा मी ही गोष्ट गंभीरपणे घेतली नव्हती. मी कुटुंबामध्ये राहणारा व्यक्ती आहे. त्यामुळे मला आणि माझ्या कुटुंबियांनाही या गोष्टीचा त्रास झाला आहे. त्यामुळे आता सोशल मीडियावरील अकाऊंट बंद करण्याचा निर्णय मी घेत आहे. आज जो तुम्हाला माझ्यामुळे त्रास झाला आहे, त्यासाठी मी दिलगिरी व्यक्त करतो.”

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here