पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू सिकंदर बख्तने एक पुस्तक प्रकाशित केले होते. या पुस्तकामध्ये बख्त यांनी बेन स्टोकचा हवाला देत, भारत विश्वचषकात इंग्लंडकडून ठरवून हरला, असे म्हटले गेले होते. यावर आता स्टोक्स काय म्हणाला, पाहा…
विश्वचषकात भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये एक सामना झाला होता. या सामन्यात इंग्लंडने ३३८ धावांचे लक्ष्य भारतापुढे ठेवले होते. हा सामना भारत जिंकला असता तर पाकिस्तानला उपांत्य फेरीत काही समीकरणांच्या आधारावर पोहोचण्याची संधी होती. पण या सामन्यात भारताला ३१ धावांनी पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे पाकिस्तानला उपांत्य फेरीत पोहोचला आले नव्हते.
स्टोक्स नेमकं काय म्हणाला…स्टोक्सने सिकंदर बख्त यांनी केलेले वक्तव्य चुकीचे असल्याचा खुलासा केला आहे. स्टोक्सने याबाबत एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये स्टोक्स म्हणाला की, ” सिकंदर जे बोलत आहे, ते तुम्ही कुठेही शोधायला जाऊ नका. कारण मी तसे काहीच बोललेलो नाही. काही शब्दांची हेराफेरी करून स्वत:ला प्रकोशझोतात आणण्यासाठी त्यांनी ही गोष्ट केली असावी.”
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times