करोना व्हायरसमुळे आता अजून एक धक्का क्रीडा विश्वाला बसला आहे. कारण गेल्या १२४ वर्षांचा इतिहास असलेली बोस्टन मॅरेथॉन या वर्षी पहिल्यांदाच रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. १२४ वर्षांच्या इतिहासामध्ये ही गोष्ट पहिल्यांदाच पाहायला मिळाली आहे.

बोस्टन मॅरेथॉन ही या वर्षी एप्रिलमध्ये आयोजित करण्यात आली होती. पण करोना व्हायरसमुळे ही बोस्टन मॅरेथॉन सप्टेंबर महिन्यात पुढे ढकलण्यात आली होती. पण आता तर बोस्टन मॅरेथॉन रद्द करण्याचा निर्णय येथील महापौरांनी घेतला आहे.

वाचा-

बोस्टनचे महापौर मार्टी वॉल्श यांनी सांगितले की, ” मॅरेथॉन म्हटलं की एकाच ठिकाणी बरीच लोकं जमणार. त्यामुळे ही गोष्ट सध्याच्या घडीला आरोग्यासाठी धोकादायक आहे. सध्याच्या घडीला या परिस्थितीमधून बाहेर पडणे सर्वात महत्वाचे आहे. आर्थिक स्थिती जर सांभाळायची असेल तर काही पावलं उचलावी लागतील. त्यामुळे सप्टेंबर तर सोडाच पण या वर्षभरात मॅरेथॉनसारखी शर्यत आयोजित करणे उचित ठरणर नाही.”

वाचा-

या वर्षातील काही स्पर्धा रद्द किंवा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. टेनिसच्या काही महत्वाच्या स्पर्धा रद्द कराव्या लागल्या आहेत. ज्या स्पर्धा दर वर्षी ठराविक महिन्यांमध्ये खेळवल्या जातात, त्यांना मोठा धक्का बसला आहे. ट्वेन्टी-२० विश्वचषक होणार की नाही, याबाबतही संभ्रमाचे वातावरण आहे. पण दुसरीकडे भारतामध्ये आयपीएल भरवण्यासाठी बीसीसीआयने कंबर कसल्याचे समजत आहे. कारण विश्वचषक जर रद्द झाला तर त्या कालावधीमध्ये आयपीएल खेळवण्यासाठी बीसीसीआय आतूर असल्याचे म्हटले जात आहे.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here