या यादीमध्ये नामांकित खेळाडूंचा समावेश आहे. पण भारताकडून कोहली वगळता एकही खेळाडू या १०० जणांच्या यादीमध्ये स्थान पटकावू शकलेला नाही. कोहलीने गेल्या वर्षभरात २६ मिलियन डॉलर म्हणजे जवळपास १९७ कोटी रुपयांची कमाई केल्याचे पुढे आले आहे. गेल्या बारा महिन्यांमधील ही कमाई आहे. कोहली या १०० श्रीमंत खेळाडूंच्या यादीमध्ये ६६ व्या स्थानावर आहे.
कोहलीची अशी होते कमाई…
बीसीसीयशी करारकोहली हा बीसीसीआयशी करारबद्ध आहे. बीसीसीआय फॉर्मात असलेल्या खेळाडूंबरोबर वार्षिक करार करत असते. या करारामध्ये कोहली हा A+ या सर्वोत्तम ग्रेडमध्ये आहे. त्यामुळे कोहलीला बीसीसीआयकडून १० लाख अमेरिकन डॉलर एवढी रक्कम गेल्या वर्षभरात मिळाली आहे.
क्रिकेटशी निगडीत अन्य उत्पन्नवर्षभरात विविध स्पर्धा होतात. या स्पर्धेत खेळण्यासाठी काही रक्कम खेळाडूंना दिली जाते. त्याचबरोबर मालिका जिंकल्यावरही रोख रक्कम मिळते. त्याचबरोबर सामनावीर आणि मालिकावीर असे पुरस्कारांमधूनही खेळाडूंना रोख रक्कम मिळत असते. गेल्या वर्षी कोहलीने या सर्व माध्यमांतून १० लाख अमेरिकन डॉलर कमावले आहेत.
जाहिराती आणि अन्य करारभारतामध्ये सध्याच्या घडीला सर्वात जास्त जाहिराती या कोहलीकडे असल्याचे पाहायला मिळते. सध्या कोहलीकडे आठपेक्षा जास्त कंपनीच्या जाहिराती आहे. त्याचबरोबर कोहलीचा चाहता वर्ग फार मोठा आहे. त्यामुळे ट्विटर, इंस्टाग्रामवर त्याची पोस्ट लगेच व्हायरल होत असते. या कंपन्यांबरोबरही कोहलीचे करार आहेत. त्यामुळे गेल्या वर्षी या सर्व माध्यमातून कोहलीने २ कोटी ४० लाख डॉलर एवढी रक्कम कमावल्याचे पाहायला मिळाले आहे. क्रिकेटपेक्षा जाहीरातींमध्ये कोहलीची सर्वाधिक कमाई होत असल्याचे पाहायला मिळाले आहे.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times