भारतामध्ये क्रिकेट काही दिवसांत सुरु होऊ शकते, असे म्हटले जात होते. पण भारतातील क्रिकेटला आता मोठा धक्का बसला आहे. कारण भारतातील निवड समिती सदस्याला करोना झाल्याचे निदान झाले आहे. त्यामुळेच आता भारताच्या क्रिकेटमध्येही करोनाने शिरकाव केल्याचे म्हटले जात आहे.

संघ निवडण्याचे काम निवड समितीचे असते. संघ निवडण्यासाठी सदस्य हे बऱ्याच ठिकाणी फिरत असतात. जिथे स्पर्धा किंवा सराव सुरु असतो, तिथे हे सदस्य जात असतात. त्यामुळे बऱ्याच लोकांशी त्यांचा संपर्क येत असतो. त्याचबरोबर संघ निवडताना एक बैठक बोलावली जाते. या बैठकीमध्ये सर्व निवड समिती सदस्य आणि संघाचे कर्णधार व प्रशिक्षकही असतात. त्यामुळे आता हे निवड समिती सदस्य ज्या व्यक्तींच्या संपर्कात आले आहेत त्यांनाही आता ही चाचणी करावी लागणार आहे.

बीसीसीआयचे दिवंगत अध्यक्ष जगमोहन दालमिया यांचे पूत्र अविषेक यांनी आज ही माहिती दिली आहे. अविषेक हे बंगाल क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष आहेत. अविषेक यांनी सांगितले की, ” बंगाल क्रिकेट समितीमधील सदस्य सागरमॉय सेनशर्मा यांना करोना झालेला आहे. त्यांच्या पत्नीला यापूर्वी करोना झाला होता. त्यांच्यावर योग्य उपचार केल्यामुळे त्यांची प्रकृती आता ठिक आहे. पण आता सागरमॉय यांना करोनाची बाधा झाल्याचे पाहायला मिळाले आहे, त्यामुळे त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. त्यांच्या कुटुंबियांचीही करोना चाचणी करण्यात आली असून त्यांच्यामध्ये अन्य कोणालाही करोना झाला नसल्याचे स्पष्ट झाले आहे.”

सेनशर्मा हे बंगालच्या रणजी विजेत्या संघाचे सदस्य होते. बंगालने १९९८-९० साली रणजी करंडक जिंकला होता, तेव्हा सेनशर्मा हे संघाचे सदस्य होते. सध्याच्या घडीला त्यांच्यावर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहे. त्यांचा वैद्यकीय खर्च बंगाल क्रिकेट संघटना उचलणार आहे. सेनशर्मा हे ज्या व्यक्तींच्या संपर्कात होते, त्यांची आता करोना चाचणी करावी लागणार आहे. सेनशर्मा हे गेल्या काही काळात क्रिकेटशी निगडीत कोणत्या व्यक्तींना भेटले होते, हेदेखील पाहणे गरजेचे आहे.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here