भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने २००७ साली भारताला ट्वेन्टी-२० विश्वचषक जिंकवून दिला होता. त्यामुळे जेव्हा आयपीएलच्या पहिल्या मोसमासाठी लिलाव करण्यात आला तेव्हा धोनीला आम्ही संघात न घेण्याचे ठरवले, असा खुलासा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु या आयपीएलमधील संघाने केला आहे. धोनीला संघात न घेण्याचे कारणही त्यांनी स्पष्ट केले आहे.

धोनीची २००७ पासून क्रिकेटमध्ये चलती सुरु झाली. भारताने विश्वचषक जिंकला आणि धोनी यशस्वी कर्णधार म्हणूनही त्यानंतर पुढे आला. आयपीएलमध्ये धोनीने दमदार कामगिरी करत चेन्नई सुपर किंग्सच्या संघाला विजेतेपदही मिळवून दिले. पण आरसीबीच्या संघाला एकदाही जेतेपद पटकावता आलेले नाही. आरसीबीने धोनीऐवजी कोहलीवर जास्त लक्ष केंद्रीत केले, पण कोहलीला आपल्या संघाला एकही जेतेपद आतापर्यंत जिंकवून देता आले नाही.

बीसीसीआयचे माजी अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांनी धोनीला आपल्या संघात घेण्यासाठी तब्बल १५ लाख रुपये मोजले होते. आरसीबीचा संघही धोनीच्या नावाचा विचार करत होता. पण त्यांनी त्यानंतर धोनीचा संघासाठी विचार करणे थांबवले. कारण एवढी मोठी रक्कम देण्यासाठी आरसीबीचा संघ तयार नव्हता. समालोचक आणि आरसीबीचे मुख्य कार्यकारी अधिकारी चारू शर्मा यांनी आज एका मुलाखतीमध्ये धोनीला आरसीबीने आपल्या संघात का घेतले नाही, याबाबतचा खुलासा केला आहे.

आरसीबीचे अधिकारी धोनीबाबत काय म्हणाले…आयपीएलचा जेव्हा पहिला लिलाव झाला तेव्हा बऱ्याच संघ मालकांची नजर धोनीवर होती. पण चेन्नई सुपर किंग्सने तब्बल १५ लाख रुपये मोजत आपल्या सघात घेतले होते. त्यावेळी ही सर्वाधिक रक्कम असल्याचे म्हटले जात होते. याबाबत शर्मा यांनी सांगितले की, ” जेव्हा धोनीवर १५ लाखांची बोली लागली होती, तेव्हा यापुढे आपण जाऊ नये असे आम्हाला वाटले होते. कारण क्रिकेट हा काही एकट्या खेळाडूचा खेळ नाही. हा एक सांघिक खेळ आहे. त्यामुळे जर धोनी काही सामन्यांमध्ये कमी धावांमध्ये बाद झाला असता तर त्याच्यासाठी एवढे पैसे का मोजले, असा सवाल चाहत्यांनी केला असता. धोनीवर एवढी रक्कम खर्च केली असती तर आम्ही बाकीच्या अन्य गोष्टी पाहण्यात यशस्वी झालो नसतो.”

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here