मुंबई: लॉकडाऊनमुळे सर्व स्पर्धा स्थगित करण्यात आल्या आहेत. अशा वेळी घरी बसलेले खेळाडू सोशल मीडियाचा खुप वापर करत आहेत. अनेक क्रिकेटपटू लॉइव्ह चॅटच्या माध्यमातून एकमेकांशी संवाद करत आहेत. भारतीय क्रिकेट संघातील काही खेळाडू सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असतात. अशाच एका खेळाडूने गल्ली क्रिकेटमधील DRSचा एक गंमतीशीर व्हिडिओ शेअर केला आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये DRSच्या नियमामुळे सामन्यांचे निकाल बदलले, अनेक क्रिकेटपटूंना जिवनदान मिळाले. पण गल्ली क्रिकेटमध्ये सुरू झाले तर काय होईल याचा विचार तुम्ही कधी केला आहे का?

वाचा-
भारताचा फिरकीपटू आर.अश्विनने सोशळ मीडियावर गल्ली क्रिकेटचा असाच एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही हसू रोखू शकणार नाही. मी हा व्हिडिओ पाहिल्यानंतर हसू रोखू शकलो नाही. मला नाही माहिती की याला काय कॅप्शन देऊ, असे अश्विनने हा व्हिडिओ शेअर करताना म्हटले आहे.

अश्विनच्या या व्हिडिओवर चाहत्यांच्या देखील गंमतीशीर प्रतिक्रिया येत आहेत. काही दिवसांपूर्वी अश्विनने इस्टाग्रामवर विराट कोहली सोबतच्या लाइव्ह चॅटमध्ये UFO पाहण्याची इच्छा असल्याचे सांगितले होते.

वाचा-
अश्विनने शेअर केलेल्या व्हिडिओत, काही मुळे क्रिकेट खेळत आहेत. चेंडू टाकल्यानंतर तो सरळ विकेटकिपरच्या हातात जातो. त्यावर सर्व जण अपील करतात आणि अंपायर फलंदाजाला बाद देतो. त्यावर फलंदाज DRSचा निर्णय घेतो. गल्ली क्रिकेटमध्ये DRS कसा चेक केला जातो याचे अभिनय या व्हिडिओत करून दाखवला आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर क्रिकेट चाहते हसू रोखू शकणार नाही.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here