वाचा-
भारतीय संघातील जलद गोलंदाज मोहम्मद शमीची पत्नी सोशल मीडियावर सक्रीय असते. याआधी व्हिडिओमुळे ती अनेक वेळा चर्चेत आली होती. आता हसीनाने सोशल मीडियावर एक न्यूड फोटो शेअर करून सर्वांना धक्काच दिला. हसीनाने शेअर केलेल्या फोटोत एक व्यक्ती देखील दिसत आहे.
वाचा-
फोटोतील व्यक्ती शमी असल्याचा दावा केला जात आहे. महाराष्ट्र टाइम्सने या फोटोतील व्यक्तीची सत्यता तपासली नाही. इंटरनेटवर या फोटोवर शमीचे चाहते अन्य लोक संतप्त झाले आहेत.
हा फोटो शेअर करताना हसीनाने एक मेसेज लिहला आहे. ती म्हणते,
कल तू कुछ नहीं था तो मैं पाक थी, आज तू कुछ बन गया तो मैं नापाक हो गई। झूठ बुर्खा डालकर बेपर्दा सच को मिटा नहीं सकता। मगरमच्छ के आंसू कुछ दिनों का ही सहारा होते हैं. या मेसेजसह क्रिकेटपटू शमी अहमद सोबत असे हसीनाने लिहले आहे.
गेल्या काही वर्षापासून शमी आणि हसीना यांच्यात वाद सुरू आहेत. हसीनाने शमीवर गंभीर आरोप केले होते. तेव्हापासून हे दोघे वेगवेगळे राहत आहेत. या दोघांना एक मुलगी आहे.
सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चेत येण्याची हसीनाची ही पहिली वेळ नाही. याआधी व्हिडिओ आणि फोटोद्वारे ती चर्चेत आली आहे. रमजानच्या काळात डान्स व्हिडिओ शेअर केल्यामुळे युझर्सनी तिला ट्रोल केले होते.
यावेळी मात्र हसीनाने न्यूड फोटो शेअर करून सर्वांना धक्का दिला.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times