मुंबई: करोना व्हायरसमुळे जगभरात लाखो लोकांचा मृत्यू झाला. भारतात देखील या व्हायरसची लागण झालेल्यांची संख्या १.७ लाखाच्या पुढे गेली आहे. देशात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात असून यामुळे अनेक जण अडचणीत आले आहेत. अनेकांवर नोकरी गमवण्याची आणि पगार कपातीची वेळ आली आहे. यात भारताच्या एका युवा क्रिकेटपटूच्या आईचा देखील समावेश आहे.

वाचा-
भारतीय संघाकडून १९ वर्षाखालील वर्ल्ड कप स्पर्धेत खेळणारा गोलंदाज यांची आई वैदैही बेस्ट बस सेवेत कंडक्टर आहे. करोना व्हायरसचे रुग्ण आढळल्याने त्यांची इमारत काही दिवसांसाठी सील करण्यात आली होती. त्यामुळे अथर्वच्या आईला कामावर जाता आले नाही.

पाहा-

कोरनाच रुग्णांची संख्या वाढल्याने अथर्वने मला कामावर जाऊ नये असे सांगितले. त्यातच आमच्या बिल्डिंगमध्ये करोनाचा एक रुग्ण आढळला. ज्यामुळे इमारतीच्या बाहेर कोणालाच जाता आले नाही. आम्ही कामावर गेले नाही तर गैरहजेरी लावली जाते. यामुळे काही दिवसांचा पगार कापण्यात आला. पण असे कसे चालेल? मला माझा पूर्ण पगार मिळाला पाहिजे. मी कसे तरी अथर्वला मनवले आणि कामावर हजर झाल्याचे, वैदेही यांनी टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना सांगितले.

वाचा-
अथर्वच्या वडिलांचे निधन झाल्यानंतर वैदेही यांना त्यांच्या जागी बेस्टमध्ये काम मिळाले. करोना व्हायरस वॉरिअर्स म्हणून जे लोक काम करत आहेत. पोलिस, आरोग्य कर्मचारी आणि माध्यम प्रतिनिधी अशा लोकांना येण्या जाण्यासाठी बस सेवा सुरू केली आहे. त्या बसमध्ये वैदेही कंडक्टर म्हणून काम करतात.

वाचा-
बीएमसी कर्मचारी, पोलिस, डॉक्टर आणि नर्स यांना अशा संकटकाळी कामावर जावे लागते. अशा लोकांसाठी बस सेवा करण्यात माझे ही योगदान असल्याचे त्या म्हणाल्या. पण आमच्या सारख्या लोकांना कोणत्याही प्रकारचे विमा संरक्षण नाही. आतापर्यंत बेस्टचे आठ कर्मचारी करोनामुळे दगावले. जर त्यांना विमा संरक्षण असते तर कुटुंबीयांना दिलासा मिळाला असता असे, वैदेही यांनी सांगितले.

फिरकीपटू अथर्वने १९ वर्षाखालील आशियाई स्पर्धेच्या फायनलमध्ये शानदार प्रदर्शन केले होते. त्याने २८ धावा देत ५ विकेट घेतल्या होत्या.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

167 COMMENTS

  1. Drugs information sheet. Learn about the side effects, dosages, and interactions.
    [url=https://tadalafil1st.com/#]tadalafil[/url]
    Learn about the side effects, dosages, and interactions. Everything what you want to know about pills.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here