मुंबई: भारताचा अष्ठपैलू क्रिकेटपटू हार्दिक पंड्याने एक गोड बातमी दिली आहे. हार्दिक लवकरच बाप होणार आहे. ही गोड बातमी त्याने स्वत: सोशल मीडियावरून दिली. हार्दिक पंड्याने नव वर्षाच्या पहिल्या दिवशी सर्बियन मॉडेल-अभिनेत्री नताशा स्टॅन्कोविकबरोबर साखरपुडा केला होता.

वाचा-
विशेष म्हणजे हार्दिकने एक नव्हे तर दोन गोड बातम्या दिल्या आहेत. नताशा आई होणार असल्याचे जाहीर करताना त्याने विवाह केल्याचे देखील सांगितले. हार्दिकने इस्टाग्रामवर चार फोटो शेअर केले आहेत. पहिल्या फोटोत तो नताशा सोबत दिसतो. तर दुसरा फोटो दोघांच्या लग्नाचा आहे. या फोटोत हार्दिक आणि नताशा विवाह केल्याचे दिसते.

वाचा-

वाचा-
सर्बियामध्ये जन्मलेल्या नताशाने वयाच्या तिसऱ्या वर्षी नृत्य शिकायला सुरुवात केली होती. १७ व्या वर्षी तिनं मॉडर्न स्कूल ऑफ बॅलेमध्ये प्रवेश घेतला. २०१०मध्ये मिस स्पोर्ट्स सर्बियाचा पुरस्कार जिंकल्यानंतर अभिनय आणि नृत्य यात करिअर करण्याचा निर्णय घेतला. हेच स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिने २०१२मध्ये बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले. बिग बॉसच्या आठव्या पर्वातून तिला खरी ओळख मिळाली.

लॉकडाऊनच्या काळात हार्दिक आणि नताशा एकत्रच होते. गेल्या दोन महिन्यात हार्दिकने त्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केले होते.

हे देखील वाचा-

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here