धोनीच्या निवृत्तीनंतर साक्षी ही चांगलीच वैतागली होती. त्यामुळे आपण ट्विट का डिलीट केले, याबाबत साक्षीने खुलासा केला आहे. साक्षी चेन्नई सुपर किंग्सच्या रुपा रुमाणीसोबत चर्चा करत होती. या चर्चेमध्ये साक्षीने आपण ते ट्विट का डिलीट केले, याबाबत सांगितले आहे. साक्षी म्हणाली की, ” धोनीने निवृत्ती घेतली आहे का? सोशल मीडियावर नेमकं काय चाललं आहे? दिवसभर #DhoniRetires हा हॅशटॅग ट्रेंड होत आहे, याबाबत त्यांनी मला विचारणा केली. त्यावेळी असे बरेच लोकं असतील की त्यांना सत्य माहिती नसेल, त्यासाठी मी ट्विट करण्याचा निर्णय घेतला. त्यांतर धोनीने निवृत्ती घेतलेली नाही, असे ट्विट मी केले होते. पण हे ट्विट मी का डिलीट केले, ते मला आता आठवत नाही. ट्विट डिलीट केले असले तरी सर्वांना योग्य तो संदेश मिळाला आणि माझे काम झाले होते”
भारतीय संघातून मोठ्या कालावधीसाठी बाहेर असेलल्या धोनीच्या भविष्यासंदर्भात नेहमची चर्चा केली जाते. सोशल मीडियावर होणाऱ्या धोनीच्या निवृत्तीसंदर्भातील बातम्यांवर साक्षीने आश्चर्य व्यक्त करत अशा बातम्या कोठून येतात अशा प्रश्न केला. तसेच धोनीची नजर पुन्हा एकदा भारतीय संघाकडून खेळण्याची असल्याचे संकेत साक्षीने दिले आहेत. धोनीने गेल्या वर्षी आयसीसी वर्ल्ड कपमधील न्यूझीलंडविरुद्ध झालेली सेमीफायनलची लढत खेळली होती. त्या सामन्यात भारताचा पराभव झाला आणि वर्ल्ड कपमधून टीम इंडिया बाहेर पडली.
वर्ल्ड कपनंतर धोनीने काही काळ विश्रांती घेण्याचे ठरवले होते. बीसीसीआयने खेळाडूंच्या करारातून धोनीला वगळले, त्यामुळे खरच धोनी निवृत्ती घेईल अशी चर्चा होती. पण धोनीने आयपीएलचा १३वा हंगाम खेळून भारतीय संघात येणार असल्याचे संकेत दिले. मात्र करोना व्हायरसमुळे आयपीएल अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times