लॉकडाऊनमुळे बऱ्याच जणांचे उद्योग बंद आहेत. रोजंदारीवर काम करणाऱ्या लोकांवरही वाईट वेळ आली आहे. मोठी माणंस एखाद वेळेस काही तरी करू शकतात, पण लहान मुलं या साऱ्या गोष्टींमध्ये भरडली जातता. तब्बल ३५ हजार लहान मुलं भुकेने व्याकूळ झाली आहेत, जे जेव्हा या क्रिकेटपटूला समजले तेव्हा आपल्या पत्नीसहीत तो त्यांच्या मदतीसाठी धावला.
लहान मुलांच्या भुकेचा प्रश्न फक्त या क्रिकेटपटूने सोडवलेला नाही. तर त्यांच्या घरी जाऊन त्यांना नेमकी कशाची जास्त गरज आहे, हेदेखील त्याने जाणून घेतले आणि त्यांना सर्वतोपरी मदत करण्याचे ठरवले. सध्याच्या काळात तर या ३५ मुलांना या खेळाडूने जवळपास दत्तक घेतल्याचेच दिसत आहे. कारण त्यांच्या सर्व गरजा हा क्रिकेटपटू पुरवत असल्याचे पाहायला मिळत आहे.
हा क्रिकेटपटू आहे तरी कोण…३५ हजार उपाशी मुलांचे पोट भरणारा हा खेळाडू आहे तरी कोण, हा सवाल तुम्हाला पडला असेल. हा क्रिकेटपटू आहे दक्षिण आफ्रिकेचा फॅफ ड्यू प्लेसिस. फॅफ पत्नी इमारी यांच्याबरोबर या ३५ हजार उपाशी मुलांसाठी धावून गेला असून त्यांची भूक शमवण्याचे पुण्याचे काम त्याने केले आहे. फॅफबरोबर रग्बी संघाचा कर्णधार सिया कोलीसी हा खेळाडूदेखील गरजू मुलांच्या मदतीसाठी पुढे आला आहे. केपटाऊनमध्ये या दोघांनी मिळून प्रत्येक गरजूच्या घरी जाऊन त्यांनी मदत केल्याचे पाहायला मिळत आहे.
भारतीय खेळाडूने केला सलामफॅफच्या या कामाला भारीतीय क्रिकेटपटू सुरेश रैनाने सलाम ठोकला आहे. रैनाने याबाबत एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये रैना म्हणाला की, ”
“जी लहान मुलं करोना व्हायरसच्या काळात संकटात आहेत त्यांना फॅफने मदत केली आहे. त्याच्या या कामाचे कौतुक करावे तेवढेच थोडे आहे. मी लोकांना आवाहन करतो की, त्यांनीही या पुण्याच्या कामासाठी पुढे यावे आणि मदत करावी.”
रैनाच्या या मेसेजबाबत फॅफने त्याचे आभार मानले आहेत.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times