मणिपूर सरकारने रविवारी करोना बुलेटिन जाहीर केले यात पाच लोकांना करोनाची लागण झाल्याचे सांगितले. एक रुग्ण इम्फाळमधील होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार २० मे रोजी डिंको दिल्लीहून मणिपूरला गेले होते.
वाचा-
डिंको रेडिएशन थेरपीसाठी दिल्लीला आले होते. पण दिल्लीत त्यांना कावीळ झाल्याने ते पुन्हा मणिपूरला गेले. दिल्लीतून निघताना त्यांची करोना चाचणी झाली होती. तेव्हा ती नेगेटिव्ह होती. पण मणिपूरला पोहोचल्यानंतर झालेल्या चाचणीत डिंको पॉझिटिव्ह असल्याचे आढळले.
डिंको यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आधीच ते एका आजाराशी लढत असताना आता त्यांना करोना झाला. दिल्ली होते तेव्हा त्यांची काळजी घेणारी नर्स करोना पॉझिटिव्ह झाली होती. मार्च महिन्यात त्यांच्यावर रेडिएशन थेरपी होणार होती. पण लॉकडाऊनमुळे त्यासाठी विलंब झाला. एप्रिल महिन्यात भारतीय महासंघाच्या प्रयत्नाने एअर अॅब्युलन्सने त्यांना दिल्लीला आणण्यात आले.
वाचा-
दिल्लीत कावीळ झाल्याने त्यांच्यावर रेडिएशन थेरपी होऊ शकली नाही. त्यानंतर २ हजार ४०० रस्त्याच्या मार्गे इम्फाळला येण्यात आले. डिंको यांनी प्रवास केलेल्या रुग्णवाहिकेमुळे त्यांना करोणाची लागण झाली असावी, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
डिंको यांच्यावर २०१७ पासून कॅन्सरवर उपचार सुरू आहेत. बँकॉकमध्ये १९९८ साली झालेल्या आशियाई स्पर्धेत त्यांनी सुवर्णपदक जिंकले होते. त्याच वर्षी त्यांना अर्जुन पुरस्कार आणि २०१३ साली पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले. सहावेळा वर्ल्ड चॅम्पियन मेरी कोमचे प्रेरणास्थान आहेत डिंको. मेरीचे प्रशिक्षक म्हणून काही काळ त्यांनी काम केले.
वाचा-
मणिपूरमध्ये आतापर्यंत करोनाचे ७१ रुग्ण आढळले असून त्यापैकी ११ जण बरे झाले आहेत. राज्यात करोनामुळे एकाचाही मृत्यू झालेला नाही.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times