जॉर्ज फ्लॉएडची पोलिसांनी हत्या केली असल्याचा आरोप करत अमेरिकेत वर्णद्वेषविरोधी आंदोलन चांगलेच पेटले आहे. या आंदोलनात आता वेस्ट इंडिजचा धडाकेबाज सलामीवीर ख्रिस गेलनेही उडी घेतली आहे. गेलने सोशल मीडियावर एक संदेश लिहिला आहे आणि वर्णद्वेषाविरोधात आवाज उठवला आहे.

जॉर्ज फ्लॉएडची पोलिसांच्या ताब्यात असताना हत्या झाली. डेरेक चाऊविन नावाच्या एका पोलिस अधिकाऱ्याने जॉर्ज फ्लॉएडची मान आपल्या गुडघ्याने जोरात दाबली. या प्रकारात जॉर्ज फ्लॉएडचा मृत्यू झाला. त्यानंतर आता अमेरिकेला जगभरातील लोकांचा रोष पत्करावा लागत आहे.

वर्णद्वेषाविरोधात ख्रिस गेलने एक भावनात्मक संदेश लिहिला आहे. वर्णद्वेष हा फक्त फुटबॉलपुरता मर्यादीत नाही तर तो क्रिकेटमध्येही आहे, असे गेलने म्हटले आहे. आपणही या वर्णद्वेषाचा सामना काही वेळा केला आहे, असेही गेलने म्हटले आहे.

गेलने आपल्या संदेशामध्ये म्हटले आहे की, ” मी जगभर फिरत असतो, त्यावेळी मलाही वर्णद्वेषाबाबत काही टिप्पणी ऐकावी लागली आहे. पण आता हे सर्व प्रकार बंद व्हायला हवेत.”

वर्णद्वेषी आंदोलनाची तीव्रता अमेरिकेत वाढत आहे. व्हाइट हाउससमोर आंदोलन करणाऱ्या एका गटाने जाळपोळ करण्याचा प्रयत्न केला होता. आंदोलनाची तीव्रता लक्षात घेता राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना बंकरमध्ये नेण्याची वेळ सुरक्षा रक्षकांवर आली. अमेरिकेतील जवळपास ४० शहरांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. आता या आंदोलनामागे असणाऱ्या गटांना दहशतवादी संघटना घोषित करणार असल्याचा इशारा ट्रम्प यांनी ट्विटद्वारे दिला आहे.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here