सोशल मीडियावर कधी काय होईल, हे सांगता येत नाही. आज तर भारताच्या एका क्रिकेटपटूच्या बायकोने टीकाकारांना चक्क सोशल मीडियावर शिव्या दिल्याचे पाहायला मिळाले आहे. नेमके प्रकरण आहे तरी काय…

हा क्रिकेटपटू भारताकडून क्रिकेट खेळला आहे, त्याचबरोबर आयपीएलमध्येही त्याने काही संघांचे प्रतिनिधीत्व केले होते. पण आज चाहत्यांनी त्याचे नाव घेत एक गोष्ट केली आणि त्यानंतर या क्रिकेटपटूच्या बायकोने या टीकाकारांना चक्क सोशल मीडियावर शिव्या घातल्याचे पाहायला मिळाले आहे.

हा खेळाडू आहे कोण…भारताकडून १२ एकदिवसीय आणि तीन ट्वेन्टी-२० सामने हा क्रिकेटपटू खेळला आहे. त्याचबरोबर आयपीएलमध्ये तो रायझिंग पुणे सुपरजायंट्स या संघात होता. त्याटनंतर त्याला किंग्ज इलेव्हन पंजाब या संघात स्थान दिले होते. हा क्रिकेटपटू आहे मनोज तिवारी.

नेमके प्रकरण काय…मनोजने भारतासाठी अखेरचा सामना २०१५ साली झिम्बाब्वेविरुद्ध खेळला होता. मनोज आयपीएलमध्ये खेळला होता, पण २०१९ सालानंतर मनोजला एकाही आयपीएलमधील संघाने संधी दिली नाही. लिलावाच्यावेळी त्याच्यावर कोणीच बोली लावली नव्हती. त्यामुळे सध्या मनोज हा भारतीय आणि आयपीएलच्या कोणत्याही संघात नाही. आयपीएलच्या चाहत्यांनी या लीगमध्ये अपयशी ठरलेल्या दहा खेळाडूंची यादी जाहीर केली होती. यामध्ये मनोजचाही समावेश होता. ही यादी जाहीर झाल्यावर मनोजची पत्नी सुश्मिता या यादीमधून टीका करणाऱ्यांवर चांगलीच भडकली आहे. या लोकांना सुश्मिताने अपशब्द वापरले आहेत, त्याचबरोबर तुम्हाला ही गोष्ट करण्याचा अधिकार कोणी दिला, हा प्रश्नही विचारलेला आहे.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here