नवी दिल्ली: सोमवारी रात्रीपासून ट्वीटरवर एक हॅशटॅग ट्रेंड करत आहे. हा हॅशटॅग भारताच्या माजी क्रिकेटपटू संदर्भातील असून त्यात त्याने माफी मागावी असे म्हटले आहे. भारतीय संघातील माजी खेळाडू आणि सिक्सर किंग अशी ओळख असलेल्या युवराज सिंगने () माफी मागावी यासाठी
#युवराज_सिंह_माफी_मांगो हा हॅशटॅग ट्रेंडमध्ये आला. जाणून घेऊयात युवराज सिंगने असे काय केले.

वाचा-
भारताच्या या माजी क्रिकेटपटूने वनडेचा उपकर्णधार (Rohit Sharma) सोबतच्या इस्टाग्राम लाइव्ह चॅटमध्ये एक जातीवाचक शब्द वापरला. दोघांच्या चॅटमधील क्लिप आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावरूनच #युवराज_सिंह_माफी_मांगो हा हॅशटॅग ट्रेंडमध्ये आला.

वाचा-
साधारण १५ दिवसांपूर्वी रोहित शर्मा आणि यांनी अनेक मुद्दयावर लाइव्ह चॅट केले. दोघांनी क्रिकेटच्या मैदानावरील आणि बाहेर अनेक गोष्टी एकमेकांसोबत आणि चाहत्यांसोबत शेअर केल्या. यातच भारतीय संघातील गोलंदाज कुलदीप यादव आणि युजवेंद्र सिंह यांच्याबद्दल कमेंट केली.

वाचा-
रोहितसोबत बोलताना युवराजने या दोन क्रिकेटपटूंबद्दल गंमतीने जातीवाचक शब्द वापरले. हा शब्द वाल्मिकी समाजाबद्दल होता. आता यावरून सोशल मीडीयावर युवराजने माफी मागावी अशी मागणी केली जात आहे. चॅटमध्ये युवराज आणि रोहित दोघे फिरकीपटू चहलच्या टिकटॉक व्हिडिओवर बोलत होते.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here