कोणावर कशी वेळ येईल, हे आपण सांगू शकत नाही. पण जे काही तुमच्या ललाटलेखावर लिहिले आहे, ते झाल्यावाचून राहत नाही. अशीच एक दुर्दैवी गोष्ट सध्या पाहायला मिळाली आहे. एका खेळाडूच्या पत्नीचे दोन महिन्यांपूर्वी निधन झाले होते. पण आता तर या खेळाडूनेही या जगाचा निरोप घेतला आहे. त्यामुळे फक्त दोन महिन्यांच्या कालावधीत त्यांच्या कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

सध्याच्या घडीला करोना व्हायरसमुळे सर्वच त्रस्त आहेत. सध्याच्या घडीला जगभरात व्यवहार ठप्प पडलेले आहेत. एका बाजूला करोना व्हायरसमुळे जगभरात हजारो मृत्यूमुखी पडत असताना क्रीडा चाहत्यांवर ही वाईट बातमी येऊन धडकली आहे.

जवळपास दोन महिन्यांपूर्वी म्हणजेच ४ एप्रिलला या खेळाडूच्या पत्नीचे हार्ट अॅटॅकने निधन झाले होते. त्यावेळी या खेळाडूला मोठा धक्का बसला होता. या धक्क्यातून तो हळूहळू सावरत होता. पण त्यानंतर क्रीडा चाहत्यांना या खेळाडूनेच मोठा धक्का दिल्याचे पाहायला मिळाले आहे.

सर्वांनाच WWEपरिचित आहे. या WWEमध्ये स्टार खेळाडू डॅनी हॅव्हॉकने नावलौकिक मिळवला होता. बऱ्याच स्पर्धांमध्ये तुम्ही त्याला पाहिलेही असेल. कारण बऱ्याच स्पर्धांमध्ये डॅनी सहभागी व्हायचा. डॅनीने २००८ साली WWEमध्ये पदार्पण केले होते. सुरुवातीपासूनच त्याने धडाकेबाज कामगिरी करत विजयाचा सपाटा लावला होता. त्याचबरोबर बऱ्याच खेळाडूंना त्याने धूळही चारली होती. २०११ साली तर गतविजेत्या ज्यूनला पराभूत करत डॅनीने सर्वांनाच धक्का दिला होता. त्याने जेतेपद आपल्या नावावर करत आता नवीन चॅम्पियन उदयास आल्याचे त्याने दाखवून दिले होते. पण २०१७ साली त्याने WWEमधून निवृत्ती घेतलेली होती.

दोन महिन्यांपूर्वी डॅनीची पत्नी ब्रायनी मोरोव्हचे हार्ट अॅटॅकने निधन झाले होते. त्यावेळी डॅनी शोकसागरात बुडालेला होता. आपल्याला आतापर्यंत साथ देणारी पत्नी आपल्यासोबत आता नसल्याचे दु:ख तो जवळच्या व्यक्तींना बोलवून दाखवत होता. पण अखेर काळानेही त्याच्यावर घात केला आणि त्यालाही प्राण सोडावे लागले. पत्नीचा मृत्यू हार्ट अॅटॅकने झाला असला तरी डॅनीच्या निधनाचे कारण अजूनही समजू शकलेले नाही.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here