नवी दिल्ली: सोशल मीडियावर अनेक वेळा चुकीच्या पोस्ट शेअर केल्या जातात. अशा पोस्टमधून बदनामी होण्याचा धोका असतो. अशाच एका पोस्टला भारतीय क्रिकेटपटूच्या पत्नीने सडेतोड उत्तर दिले.

वाचा-
क्रिकेटपटू मनोज तिवारीची पत्नी सुष्मिता रॉयने पतीला फ्लॉप क्रिकेटपटू म्हटल्यावरून भडकली. इस्टाग्रामवरील एका पोस्टमध्ये ११ खेळाडूंची यादी तयार करण्यात आली होती. यात संबंधित व्यक्तीने दावा केला होता की हे ११ खेळाडू भारतातील फ्लॉप क्रिकेटपटू आहेत. या पोस्टवर सुष्मिताने सडेतोड उत्तर दिले.

वाचा-
अशी असभ्य पोस्ट कोणी तयार केली आहे. तुझी हिम्मत कशी झाली माझ्या पतीचा यात समावेश करण्याची. अशा पोस्ट शेअर करण्याआधी वस्तुस्थिती जाणून घ्यावी, असे उत्तर सुष्मिताने दिले.

सुष्मिताच्या या उत्तरानंतर अनेक चाहत्यांनी तिला पाठिंबा दिला. मनोज तिवारीने भारताकडून आतापर्यंत १२ वनडे आणि ३ टी-२० सामने खेळले आहेत. वनडेत मनोजने प्रत्येकी एक शतक आणि अर्धशतक केले आहे. पण तो अशा अनलकी क्रिकेटपटूंपैकी आहे ज्यांना फार संधी मिळाली नाही.

वाचा-
मनोजची पत्नी सोशल मीडियावर फार सक्रिय असते. फोटोमुळे सुष्मिता प्रसिद्ध आहे. काही दिवसांपूर्वी मनोजने कोलकाता नाइट रायडर्सवर आपला राग व्यक्त केला होता. २०१२ मध्ये २७ मे रोजी केकेआरने पहिले आयपीएल विजेतेपद मिळवले होते. यासंदर्भात केलेल्या पोस्टमध्ये मनोजला टॅग करण्यात आले नाही. त्यावर त्याने राग व्यक्त केला होता. केकेआरला पहिले विजेतेपद मिळवून देण्यात मनोज तिवारीने महत्त्वाची भूमिक पार पाडली होती. त्यामुळेच टॅग न केल्याबद्दल त्याने राग व्यक्त केला होता.

मनोजने २०१२च्या आयपीएलमध्ये शानदार कामगिरी केली होती. १६ सामन्यात त्याने २६० धावा केल्या होत्या. यात एका अर्धशतकाचा समावेश होता.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here