भारतातील लॉकडाऊन उठवण्यात आले आहे, त्याचबरोबर ऑस्ट्रेलियामध्ये विश्वचषक होणार नाही असे दिसत आहे. त्यामुळे आता आयपीएलसाठी मार्ग मोकळा झाल्याचे म्हटले जात आहे. पण आयपीएल भरवण्यासाठी एक मोठी समस्या आहे, असा खुलासा बीसीसीआयचे अध्यक्ष आणि माजी कर्णधार सौरव गांगुली यांनी केला आहे.

भारतातील लॉकडाऊन उठवण्यात आले आहे. त्यामुळे आता खेळाडू सराव करू शकतात. त्याचबरोबर खेळाडूंची चाचणीही आता बीसीसीआयला घ्यावी लागेल. या सर्व गोष्टींसाठी बीसीसीआय तयार आहे. दुसरीकडे ऑस्ट्रेलियानेच या वर्षी ट्वेन्टी-२० विश्वचषकाचे आयोजन करणे धोकादायक आहे, असे आयसीसीला कळवले आहे. त्यामुळे या वर्षी होणारा विश्वचषक यजमानांनीच नकार दिल्यावर रद्द होण्याच्या मार्गावर आहे. आता ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात आयपीएल खेळवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पण तरीही आयपीएल खेळवण्यासाठी बीसीसीआयपुढे मोठा प्रश्न उपस्थित राहीला आहे.

आयपीएल खेळवण्यापुढे कोणती मोठी समस्या…आयपीएल आता लवकरच होईल, असे चाहत्यांना वाटत असले तरी या मार्गात काही अडचणी आहेत. बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी याबाबत सांगितले की, ” सध्याच्या घडीला क्रिकेट पुन्हा कधी सुरु होऊ शकेल, हे सांगता येत नाही. कारण सध्याची परिस्थिती ही सामान्य नक्कीच नाही. येत्या काही दिवसांमध्ये स्पर्धा होऊ शकतात. पण सर्वात मोठी समस्या ही आहे की, स्पर्धा नेमकी खेळवायची कुठे? कारण स्पर्धा खेळवण्यासाठी काही गोष्टी गरजेच्या असतात. त्याचबरोबर स्पर्धेचे ठिकाण सर्वात महत्वाचे असते. पण हे ठिकाणंच आतापर्यंत ठरू शकलेलं नाही, त्यामुळे आयपीएलबाबत सध्याच्या घडीला भाष्य करणे उचित ठरणार नाही. ”

आयपीएल खेळवण्यासाठी हे देश तयारजर भारतामध्ये आयपीएल खेळवणे शक्य नसेल तर दोन देशांनी भारताला आमंत्रण दिले आहे. भारताचे शेजारी राष्ट्र असलेल्या श्रीलंकेने बीसीसीआयला आयपीएल भरवण्याचे आमंत्रण दिले आहे. त्याचबरोबर संयुक्त अरब अमिरातीनेही आयपीएल खेळवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे आता आयपीएल भारतात खेळवायचे की बाहेर, याचा विचार बीसीसीआयला करावा लागणार आहे.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here