पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू रियाझ शेख यांचे करोना व्हायरसने निधन झाले आहे. या वृत्ताला पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू रशिद लतिफ यांनी दुजोरा दिला आहे. लतिफने एक ट्विट केले असून शेख यांच्या निधनाची बातमी दिली आहे.
५१ वर्षीय शेख हे पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू होते. त्यांनी पाकिस्तानमध्ये स्थानिक क्रिकेटमध्ये प्रतिनिधीत्व केले होते. शेख यांच्या नावावर ४३ प्रथम श्रेणी सामने आहेत, त्याचबरोबर त्यांनी ३५ लिस्ट A सामने ही खेळले होते. शेख यांनी ४३ प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये ११६ बळी मिळवले होते. त्याचबरोबर त्याचबरोबर दोन वेळा दहा बळी मिळवण्याचा त्यांनी पराक्रमही केला होता. त्याचबरोबर चारवेळा त्यांनी पाच विकेट्ही मिळवले होते.
शेख हे १९९७ ते २००५ या कालावधीमध्ये क्रिकेट खेळले होते. त्यानंतर त्यांनी निवृत्ती पत्करली होती. स्थानिक क्रिकेटमधून निवृत्ती पत्करल्यानंतर पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू मोइन खानच्या अकादमीमध्ये शेख गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून काम करत होते.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times