३० हजार रुपये पेन्शन

५० वर्षीय विनोद कांबळीने २०१९ मध्ये शेवटचं एका टीमचं कोचिंग केलं होतं. त्यावेळी तो टी-२० मुंबई लीगमध्ये होता. त्यानंतर करोनाने अनेक गोष्टी बदलल्या. आता तो बीसीसीआयकडून मिळणाऱ्या ३० हजार रुपयांच्या पेन्शनवर निर्भर आहे. त्याशिवाय तो तेंडुलकर मिडिलसेक्स ग्लोबल अकादमीमध्येही ट्रेनिंग देत होता, पण ते त्याच्या घरापासून अतिशय लांब आहे. भारतासाठी २००० मध्ये शेवटचं खेळणाऱ्या कांबळी केवळ १७ मॅचनंतर टीममधून बाहेर गेला.
विनोद कांबळीची आर्थिक स्थिती

विनोद कांबळीने आपल्या आर्थिक स्थितीबाबत संपूर्ण माहिती दिली आहे. त्याने सांगितलं मी सकाळी ४ वाजता उठून डिव्हाय पाटील स्टेडिअमपर्यंत कॅबने जात होतो. त्यानंतर संध्याकाळी बीकेसी ग्राउंडमध्ये शिकवत होतो, हे अतिशय कठीण काम होतं. सध्या मी केवळ बीसीसीआयच्या पेन्शनवर निर्भर आहे. मी मुंबई क्रिकेट असोसिएशनकडेही कामासाठी गेला होतो. मला आशा आहे, की मला काही काम मिळेल. आपल्या कुटुंबाचा खर्च भागवण्यासाठी मैदानावर कोणतंही काम करण्याची त्याने तयारी दाखवली आहे. हेही वाचा – झिम्बाब्वेचा दौरा सुरु होण्यापूर्वीच भारतीय खेळाडूंना दिली वॉर्निंग, सांभाळून वागा नाही तर…
सचिनला सर्वकाही माहितेय…

सचिन तेंडुलकरला या परिस्थितीबाबत माहित आहे का असा प्रश्न विचारला असता, विनोद कांबळीने सचिनला सर्व काही माहिती असल्याचं सांगितलं. सचिनला सर्व काही माहित असलं, तरी मी त्याच्याकडून अधिक आशा ठेवत नाही. त्याने मला अनेकदा मदत केली आहे. त्याने मला त्याच्या इथे कामही दिलं, मी अतिशय आनंदी होतो. सचिन माझा केवळ चांगला मित्रच नाही, तर तो नेहमीच माझ्या कठीण परिस्थितीत माझ्यासाठी उभा राहिला आहे.
कसं होतं करिअर?

विनोद कांबळीने भारतासाठी एकूण १०४ वनडे मॅच खेळल्या आहेत, तर १७ टेस्ट खेळल्या आहेत. त्याने भारतासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण ३५६१ रन केले आहेत. यात चार शतक टेस्ट मॅचमध्ये, तर दोन शतक वनडेमध्ये सामिल आहेत. कांबळीने भारतासाठी १९९१ मध्ये वनडे डेब्यू केला होता, तर २००० मध्ये त्याने शेवटची वनडे मॅच खेळली होती. आपल्या लहानशा टेस्ट करिअरमध्ये त्याने दोन डबल सेंचुरी केल्या आहेत. तर सचिनने १० वर्षांच्या प्रवासात पहिली डबल सेंचुरी केली होती.
नशेत दारु चालवण्याप्रकरणी अटक

काही दिवसांपूर्वी विनोद कांबळी एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत होता. दारुच्या नशेत गाडी चालवल्याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली (Vinod Kambli Drink And Drive Case) होती. फेब्रुवारी २०२२ मध्ये त्याने नशेत ड्रायव्हिंग करत एका गाडीला टक्कर दिली होती. गाडीला धडक दिल्यानंतर तो कारमालकाशी वादही घालत होता. अखेर त्याच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर त्याला अटक करण्यात आली आहे. त्यानंतर काळात दिवसांत त्याला जामीन मिळाला होता.
सचिन-कांबळीची दोस्ती

सचिन आणि कांबळीची दोस्ती अतिशय जुनी आहे. लहानपणापासून ते टीम इंडियापर्यंत ते एकत्र खेळले. स्कूल क्रिकेटदरम्यान या दोघांनी १९८८ मध्ये नॉटआउट ६६४ धावांची पार्टनरशिप करत सर्वांनाच याची दखल घेण्यास भाग पाडलं होतं. कांबळीने नाबाद ३४९ धावा केल्या होत्या, तर सचिनने नाबाद ३२६ धावा केल्या होत्या. सचिनने आपला आंतरराष्ट्रीय डेब्यू १९८९ मध्ये केला होता. तर कांबळीने दोन वर्षांनंतर १९९१ मध्ये आपली पहिली आंतरराष्ट्रीय मॅच पाकिस्तानविरुद्ध खेळली होती.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times