झिम्बाब्वे-भारत आणि झिम्बाब्वे दरम्यान तीन सामन्यांची वन डे मालिका खेळली जाणार आहे. हे सामने १८ ऑगस्टपासून झिम्बाब्वे येथील हरारे स्पोर्ट्स क्लब मध्ये होतील. लोकेश राहुल हा झिम्बाब्वेविरुद्ध च्या भारतीय संघाचे नेतृत्त्व करेल तर शिखर धवन उपकर्णधार पदी असेल. केएल राहुल दुखापतीनंतर तंदुरुस्त होऊन संघात परतल्याने शिखर धवनला दिलेली कर्णधारपदाची जबाबदारी काढून ती पुन्हा राहुलकडे देण्यात आली आहे. व्ही व्ही एस लक्ष्मण या संघाचे प्रशिक्षक असतील. या सामन्यांसाठी भारतीय संघ झिम्बाब्वेमध्ये दाखल झाला असून सामन्याची तयारी सुरू झाली आहे. यासोबतच भारतीय खेळाडूंना पाण्याच्या टंचाईला सामोरे जावे लागणार आहे. तर संघाला स्विमिंग पूल वापरण्यावर देखील बंदी घालण्यात आली आहे आणि आंघोळ करताना देखील पाण्याचा अपव्यय टाळावा असे सांगण्यात आले आहे.

बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी माहिती दिली…

मीडिया रिपोर्ट्सनुसार बीसीसीआयच्या एका अधिकार्‍याने या संदर्भात माहिती दिली आहे, हरारेमध्ये पाण्याची समस्या आहे आणि खेळाडूंना याची माहिती देखील देण्यात आली आहे. सर्व खेळाडूंनी पाण्याचा अपव्यय करू नये, अंघोळसाठी कमी पाणी वापरावे, असे आवाहन करण्यात आले आहे. या सोबतच स्विमिंग पूलमधील सत्र देखील थांबवण्यात आले आहे.

भारतीय संघाला विशेष सूचना…

हरारे येथे सध्या पाण्याचा दुष्काळ आहे आणि त्यामुळे येथील नागरिकांना पाण्याच्या भीषण समस्येचा सामना करावा लागत आहे. हरारेच्या आही भागांत तीन-तीन दिवस पाणीच येत नाही. लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी रांगा लावाव्या लागत आहेत. त्यामुळे बीसीसीआयने भारतीय संघाला पाणी जपून वापरण्याच्या सूचना केल्या आहेत.

एका बादली पाण्यात आंघोळ करण्याची सूचना

२०१८ मध्ये दक्षिण आफ्रिका दौर्‍यावरही अशीच समस्या निर्माण झाली होती. केप टाऊन येथील बर्‍याच भागांत पाणी नव्हतं आणि त्या ही वेळेस बीसीसीआयने खेळाडूंना एका बादलीत आंघोळ करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

​पाण्याच्या समस्येमागील कारण काय?

हरारे येथील जाफरे वॉटर ट्रीटमेंट प्लांटमधून सुमारे वीस लाख लोकांच्या घरांना पाणीपुरवठा होतो. हा प्लांट ४८ तास बंद राहणार आहे. त्यामुळे पाणीटंचाई निर्माण होईल. झिम्बाब्वेच्या राजधानीत ४८ तास पाणीपुरवठा होणार नाही. यादरम्यान खेळाडूंना पाण्याची समस्या निर्माण होऊ नये, म्हणून पाणी कमी वापरण्यास सांगण्यात आले आहे. सराव आणि नेट सरावानंतर खेळाडूंना अनेक वेळा आंघोळ करावी लागते. अशा परिस्थितीत त्यांना पाण्याअभावी अडचणी येऊ शकतात.

भारताने चक्क कर्णधारच बदलला

सुरूवातीला शिखर धवनला या दौर्‍यासाठी भारतीय संघाचा कर्णधार म्हणून नेमले होते. पण राहुल तंदुरुस्त झाल्याने तो संघात परतला आणि त्यामुळे धवनला उपकर्णधार पद देत केएल राहुल ला कर्णधार पद देण्यात आले. केएल राहुल फिटनेस टेस्ट पास झाल्याने तो संघात परतला. आयपीएल नंतर केएल राहुल पहिला सामना या दौर्‍यावर खेळणार आहे. दुखपतीमुळे तो बराच काल संघाबाहेर राहिला होता.

संघात मॅचविनरची एंट्री

भारतीय वेगवान गोलंदाज वॉशिंग्टन सुंदरला दुखापत झाल्याने त्याच्या जागी शाहबाज अहमद या फिरकीपटूला संघात सामील केले आहे. १८,२०,२२ ऑगस्ट असे तीन वन डे सामने हरारे येथे होणार आहेत.

भारताचे सामने कधी होणार, पाहा…

भारतीय संघ झिम्बाब्वेबरोबर तीन वनडे सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे. भारताचा झिम्बाब्वेचा दौरा हा १८ ऑगस्टपासून (गुरुवार) सुरु होणार आहे. भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील पहिला वनडे सामना हा १८ ऑगस्टला सुरु होईल. त्यानंतर भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील दुसरा वनडे सामना हा २० ऑगस्टला (शनिवार) खेळवण्यात येणार आहे. या मालिकेतील तिसरा वनडे सामना हा २२ ऑगस्टला (सोमवारी) खेळवण्यात येणार आहे. या दौऱ्यातील हे तिन्ही सामने हरारे येथे खेळवण्यात येणार आहेत. भारतीय संघ या दौऱ्यात फक्त तीन वनडे सामनेच खेळवण्यात येणार आहे. त्यामुळे हा दौरा १८ ते २२ ऑगस्ट एवढ्या दिवसांचाच असेल.

भारताचा संघ कसा आहे, जाणून घ्या…

भारतीय संघ : लोकेश राहुल (कर्णधार), शिखर धवन उप कर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, ईशान किशन (यष्टीरक्षक) शार्दुल ठाकुर, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), कुलदीप यादव, अक्षर पटेल, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज, दीपक चहर, शाहबाज अहमद

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here