करोना व्हायरस भारतातील क्रिकेट पूर्णपणे ठप्प झालेले होते. त्यामुळे चाहत्यांना उत्सुकता होती की, भारतातील क्रिकेट पुन्हा कधी सुरु होणार. त्यामुळे चाहत्यांसाठी एक खूष खबर आली आहे. विराट सेना लवकरच मैदानात उतरणार असल्याचे समजत आहे.

करोना व्हायरसमुळे भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील मालिका रद्द करण्यात आली होती. त्यानंतर आयपीएल २९ मार्चपासून सुरु होणार होते. पण करोना व्हायरसमुळे आयपीएलही अनिश्चित काळासाठी पुढे ढकलले गेले. त्यामुळे आता भारतामध्ये क्रिकेट कधी सुरु होणार, याची उत्सुकता सर्वांनाच होती.

करोना व्हायरसमुळे सध्याच्या घडीला सर्व क्रिकेटपटू आपल्या घरामध्येच आहेत. त्यामुळे त्यांना आता फिट ठेवण्यासाठी बीसीसीआयने पाऊल उचलले आहे. सर्व खेळाडूंना एकत्रित आणून त्यांचे सराव शिबीर आयोजित करण्यात येणार आहे. कारण जोपर्यंत फिटनेस आणि सराव सुरु होत नाही, तोपर्यंत भारतीय संघ कोणताही सामना खेळू शकत नाही. त्यासाठी बीसीसीआयने सर्व खेळाडूंना एकत्रित आणण्याचे ठरवले आहे.

कधी खेळाडूंना एकत्रित आणणारसध्याच्या घडीला भारतामध्ये मान्सून सुरु झाला आहे. त्यामुळे भारताला या २-३ महिन्यांमध्ये मैदानात सराव करता येणार नाही. त्यामुळे आता सप्टेंबरमध्ये खेळाडूंना एकत्रितपणे मैदानात उतरवण्यासाठी बीसीसीआयने कंबर कसली आहे.

काय आहे प्लॅनखेळाडूंना चार चरणांमध्ये खेळाडूंसाठी फिटनेस आणि सराव कसा करावा हे सांगण्यात येणार आहे. कारण गेल्या २ महिन्यांपासून खेळाडू आपल्या घरीच आहेत. त्यामुळे सध्याच्या घडीला त्यांचा फिटनेस हा स्पर्धा खेळण्यासाठी योग्य नसावा.

सरावाच्या ठिकाणाबाबत अनिश्चितताखेळाडूंना नेमके कुठे एकत्रित आणणार, याबाबत अजूनही काही निश्चित धोरण ठरवण्यात आलेले नाही. कदाचित भारतीय संघातील सर्व खेळाडूंना राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये एकत्रित आणले जाऊ शकते, पण या वृत्ताला अधिकृत दुजोरा अजून मिळालेला नाही. कारण सध्याच्या घडीला देशातील वाहतूक पूर्णपणे सुरु करण्यात आलेली नाही. त्यामुळे जर सर्व खेळाडूंना एका ठिकाणी जमायचे असेल तर समस्या होऊ शकते. पण सप्टेंबरपर्यंत हा प्रश्न निकाली निघेल, असे म्हटले जात आहे.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here