काही दिवसांपूर्वीच भारताच अष्टपैलू क्रिकेटपटू हार्दिक पंड्याने एकाच दिवशी आपण लग्न केले आहे आणि बाबा होणार आहोत, या दोन्ही गोष्टी एकत्रितपणे सांगितल्या होत्या. त्यावेळी काही जणांनी हार्दिकचे अभिनंदनही केले होते, तर काही जणांनी त्याच्यावर टीकाही केली होती. आता तर हार्दिकच्या वडिलांना अपशब्द वापरल्याचे समोर आले आहे, नेमके हे प्रकरण आहे तरी काय…

हार्दिक हा नेहीच चर्चेत राहत असतो. काही दिवसांपूर्वी हार्दिक कॉफी विथ करण या कार्यक्रमामध्ये गेला होता. या कार्यक्रमात हार्दिकने महिलांबद्दल अपशब्द वापरल्याचे समोर आले होते, त्याचबरोबर हार्दिकची भाषा ही सभ्यतेला साजेशी नव्हती. त्यामुळेच हार्दिक यावेळी ट्रोल झाला होता. त्याचबरोबर बीसीसीआयनेही हार्दिकचे काही काळासाठी निलंबन केले होते.

याबाबत हार्दिक म्हणाला की, ” माझ्याकडून त्यावेळी चूक झाली होती आणि मी चुकीतून चांगलाच धडा घेतला होता. ही चूक मी स्वीकार केली होती. पण त्यानंतरही या गोष्टीने माझा पिच्छा सोडला नाही. काही लोकांनी तर माझ्या घरच्यांनाही त्रास दिला. माझ्या चुकीचा त्यांना त्रास होऊ नये, असे मला वाटते. कारण घरच्यांमुळेच मी इथपर्यंत पोहोचलो आहे आणि त्यांना कोणी त्रास दिलेला मला आवडणार नाही.”

हार्दिक पुढे म्हणाला की, ” या प्रकरणानंतर काही जणांनी पातळी सोडली होती आणि माझ्याबद्दल ते काहीही बोलत होते. या गोष्टीचा घरच्यांनाही त्रास होत होता. काही जणांनी माझ्या कुटुंबियांना शिविगाळ केली होती. त्यानंतर माझ्या वडिलांनी एक मुलाखत दिली होती. या मुलाखतीनंतर माझ्या वडिलांनाही अपशब्द वापरण्यात आले. या गोष्टीमुळे मला सर्वात जास्त वाईट वाटले. माझ्या एकट्याच्या चुकीमुळे कुटुंबियांना त्रास झाला.”

हार्दिकने रविवारी आपण बाबा होणार असल्याची गोड बातमी दिली होती. त्यावेळीच आपण सर्बियन मॉडेल-अभिनेत्री नताशा स्टॅन्कोविकबरोबर लग्न केल्याचेही सांगितले होते. हार्दिकने एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो हार्दिक आणि नताशा यांच्या लग्नाचा आहे. कारण या दोघांच्या गळ्यामध्ये हार दिसत आहेत आणि त्याचबरोबर काही विधी होत असताना दिसत आहे.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here