करोना व्हायरसनंतर पहिल्यांदा जर कोणती मालिका खेळवण्यात येणार होती, तर ती इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यामधील होती. पण आता करोना व्हायरसमुळे वेस्ट इंडिजच्या काही खेळाडूंनी इंग्लंडच्या दौऱ्यावर जाण्यास नकार दिला आहे.

करोना व्हायरसनंतरही पहिला मालिका इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्ये होणार आहे. या दोन्ही देशांमध्ये सुरुवातीला तीन कसोटी सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे. या मालिकेची सुरुवात ८ जुलैपासून होणार आहे. इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्ये पहिला कसोटी सामना ८-१२ जुलै या कालावधीमध्ये एजेस बाऊल येथे होणार आहे. त्या़नंतर इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्ये दुसरा कसोटी सामना १६ ते २० जुलै या कालावधीमध्ये ओल्ड ट्रॅफर्ड येथे होणार आहे. या मालिकेतील तिसरा आणि अखेरचा सामना २४-२८ जुलै या कालावधीत याच ओल्ड ट्रॅफर्ड मैदानात होणार आहे.

इंग्लंडच्या दौऱ्यावर जाण्यास वेस्ट इंडिजच्या तीन खेळाडूंनी चक्क नकार दिल्याचे आज पुढे आले आहे. त्यामुळे वेस्ट इंडिजने आपला १४ सदस्यांचा संघच इंग्लंडला पाठवण्याचे ठरवले आहे. वेस्ट इंडिजचा फलंदाज डॅरेन ब्राव्हो, शिमरॉन हेटमायर आणि किमो पॉल या तीन खेळाडूंनी इंग्लंडच्या दौऱ्यावर जाण्यास नकार दिला आहे. त्यामुळे वेस्ट इंडिजच्या क्रिकेट मंडळाला या खेळाडूंसाठी पर्याय शोधावे लागणार आहेत. पण हा दौरा नियोजित वेळेतच होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

खेळाडू तीन आठवड्यांसाठी क्वारंटाइन होणारया मालिकेसाठी सुरक्षेचे उपाय घेतले जाणार आहे. या मालिकेसाठी वेस्ट इंडिजच्या खेळाडूंना तब्बल तीन आठवडे क्वारंटाइनमध्ये राहावे लाणार आहे. वेस्ट इंडिजचा संघ इंग्लंडमध्ये ९ जूनला पोहोचणार आहे. त्यानंतर ओल्ड ट्रॅफर्ड येथे वेस्ट इंडिजच्या खेळाडूंची व्यवस्था करण्यात येणार आहे. तीन आठवडे क्वारंटाइन झाल्यानंतरच वेस्ट इंडिजच्या खेळाडूंना क्रिकेट मालिका खेळता येणार आहे.

इंग्लंड दौऱ्यासाठी जाणारा वेस्ट इंडिजचा संघजेसन होल्डन (कर्णधार), जेरमिन ब्लॅकवूड, एन. बोनर, क्रेग ब्रेथवेट, एस. ब्रूक्स, जॅन कॅम्प्बेल, रोस्टन चेस, रहकिम डॉवरीच, शाई होप, अल्झारी जोसेफ, चेमार होल्डर, कोमार रोच आणि रायमन रेइफर.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here