वाचा-
श्रीलंकेने १९९६ साली विश्वचषक जिंकला होता. ते सर्व खेळाडू निवृत्त झाल्यावर कुमार संगकारा, महेला जयवर्धने आणि लसिथ मलिंगा यांनी संघाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली होती. या तिघांनीही दमदार कामगिरी करून संघाला बरेच विजय मिळवून दिले होते. या तिघांच्या कामगिरीच्या जोरावर श्रीलंकेने क्रिकेट विश्वात आपला दबदबा निर्माण केला होता. पण याच श्रीलंकेतील तीन खेळाडू आता मॅच फिक्सिंगमध्ये अडकल्याचे पाहायला मिळत आहे. श्रीलंकेच्या क्रिकेट मंडळाने स्पष्ट केले आहे की, सध्याच्या क्रिकेट संघातील एकही खेळाडू या मॅच फिक्सिंगमध्ये सहभागी नाही.
वाचा-
श्रीलंकेचे क्रीडा मंत्री दुलास अलाहापेरुमा यांनीच आपल्या देशातील तीन आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू मॅच फिक्सिंगमध्ये अडकले असल्याचे सांगितले आहे. क्रीडा मंत्र्यांनी यावेळी सांगितले की, ” खेळात अनुशासन राहिलेले नाही, त्याचबरोबर खेळाचे चरीत्रही गढूळ झाले आहे. श्रीलंकेच्या तीन क्रिकेटपटूंची मॅच फिक्सिंगसंदर्भात आयसीसी तपास करणार आहे.”
वाचा-
श्रीलंकेच्या क्रिकेट मंडळाने यावेळी सांगितले की, ” मॅच फिक्सिंगचे आरोप ज्या खेळाडूंवर करण्यात आले आहेत ते सध्याच्या श्रीलंकेच्या संघात नाहीत. आयीसीसी आता या प्रकरणाचा तपास करणार असल्याचे क्रीडा मंत्रींनी स्पष्ट केले आहे. पण सध्याच्या श्रीलंकेच्या राष्ट्रीय संघातील एकही खेळाडू या प्रकरणात नाही.”
काही दिवसांपूर्वी श्रीलंकेचा एक क्रिकेटपटू अमंली पदार्थ आपल्याजवळ बाळगल्यामुळे पकडला गेला होता. लॉकडाून सुरु असताना एका कारमधून हा खेळाडू प्रवास करत होता. त्यावेळी त्याला पोलिसांनी अडवले होते. पोलिसांनी जेव्हा त्याची गाडी तपासली तेव्हा त्यामध्ये अंमली पदार्थ सापडले होते. त्यानंतर या खेळाडूला शिक्षा सुनावण्यात आली होती.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times
where to buy generic sildalist pill