वाचा-
लंडनमध्ये आजच्या दिवशी १९५८ साली जन्मलेले असे क्रिकेटपटू आहेत ज्यांनी आंतरराष्ट्रीय कसोटी सामना खेळण्यासाठी स्वत:चे लग्न पुढे ढकलले. ६ फूट, १ इंच उंच असलेल्या टॉनी यांनी फक्त १ कसोटी सामना खेळला यात त्यांनी ८ धावा आणि २ विकेट घेतल्या.
वाचा-
इंग्लंडचा संघ १९८४ साली न्यूझीलंडच्या दौऱ्यावर गेला होता. मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्यात टॉनी यांना संघात स्थान मिळाले. टॉनी यांचा विवाह या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी होणार होता. पण संघात स्थान मिळालेल्या टॉनी यांनी विवाहच पुढे ढकलला. अर्थात टॉनी यांच्या या त्यागाचा इंग्लंड आणि त्यांना स्वत:ला फायदा झाला नाही. या सामन्यात इंग्लंडचा एक डाव आणि १३२ धावांनी पराभव झाला. न्यूझीलंडने पहिल्या डावात ३०७ धावा केल्या. इंग्लंडचा पहिला डाव ८२ तर दुसरा डाव ९३ धावात संपुष्ठात आला.
वाचा-
टॉनी यांचे पदार्पणातील मॅचच अखेरची आंतरराष्ट्रीय मॅच ठरली. त्यानंतर टॉनी यांनी ससेक्स सोबत करार केला आणि अनेक प्रथम श्रेणी सामने खेळले. त्यांनी २६० कसोटी सामन्यात ६७२ विकेट घेतल्या.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times