नवी दिल्ली: अर्जेंटिनाचे महान दिएगो मॅराडोना संदर्भात गेल्या काही दिवसांपासून कोणतेही वृत्त आले नाही. मॅराडोनाचे प्रशिक्षण असो की फुटबॉल स्टेडियममधील उपस्थिती ही नेहमी चर्चेचा विषय ठरते. पण आता मॅराडोना चर्चत आला आहे त्याचे कारण थोडे वेगळे आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या एका व्हिडिओत मॅराडोना सूमो पैलवाना सारखा दिसतो. जाणून घेऊयात या व्हिडिओबद्दलचे सत्य…

वाचा-
गेल्या काही दिवसापासून सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडितील व्यक्ती दिग्गज फुटबॉलपटू मॅराडोना असल्याचा दावा करण्यात आला आहे. जपानमधील सूमो पैलवानाप्रमाणे दिसणारा मॅराडोनाच्या या कथित व्हिडिओवर अनेक जण त्याच्याबद्दल काळजी व्यक्त करत आहेत. भारतातील काही लोकांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे.

वाचा-

हे आहे सत्य…
दिएगो मॅराडोनाच्या नावाने व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओतील व्यक्ती आहे रॉली सेरानो. अर्जेंटिनातील एक अभिनेता असलेला रॉली मॅराडोनासारखा दिसतो. रॉलीचा जो व्हिडिओ मॅराडोनाचा असल्याचे सांगून सध्या व्हायरल होत आहे तो एका २०१५ साली मध्ये प्रदर्शित झालेल्या युथ या चित्रपटातील आहे. या चित्रपटात रॉलीने मॅराडोनाची एक काल्पनिक व्यक्ती रेखा साकारली होती. रॉली यांनी स्वता इस्टाग्रामवर युथ चित्रपटाचा एक फोटो शेअर केला आहे. ज्यात ते मॅराडोना सारखे दिसतात.

वाचा-
मॅराडोना यांची ओळख जगातील सर्वोत्तम फुटबॉलपटू अशी केली जाते. त्यांना फिफाचा प्लेअर ऑफ दी सेंचुरी हा पुरस्कार मिळाला आहे. त्यांनी इंग्लंडविरुद्ध केलेला गोल हॅड ऑफ गॉड म्हणून ओळखला जातो. तर त्याच सामन्यात सहा खेळाडूंच्या मधून चेंडू बाहेर काडून केलेल्या गोलला द गोल ऑफ द सेंचुरी असे म्हटले जाते. अर्थात मॅराडोना हे फुटबॉलमधील सर्वात वादग्रस्त असे व्यक्तीमत्व आहे. डोपिंक चाचणीत दोषी आढळलेल्या मॅराडोना यांनी १९९१ साली १५ महिन्यासाठी निलंबित केले होते. ३७व्या वर्षी निवृत्ती घेतल्यानंतर वाढणाऱ्या वजनामुळे आणि अन्य आरोग्य समस्येमुळे ते चर्चेत होते. कोकीनच्या सेवनामुळे त्यांना अनेक आरोग्य समस्या होत्या. २००५ मध्ये शस्त्रक्रियेनंतर ते पुन्हा एकदा लोकप्रिय झाले. २००८ मध्ये ते अर्जेंटिनाच्या राष्ट्रीय संघाचे प्रशिक्षक झाले.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here