मिळाली १ लाख रुपयांची ऑफर

एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत संदीप थोरात यांनी विनोद कांबळीला नोकरी ऑफर केली. सह्याद्री मल्टीस्टेट ही एक फायनान्स कंपनी आहे. या कंपनीची एक शाखा मुंबईमध्ये सुरु होणार आहे. त्या शाखेच्या व्यवस्थापक पदासाठी त्यांनी विनोद कांबळीला विचारलं आहे. या कामासाठी विनोदला दर महिना १ लाख रुपये पगार मिळेल. आता ही नोकरी स्विकारायची की नाही? हा सर्वस्वी निर्णय विनोदचा असेल असंही ते म्हणाले. Video: महिलेने उधळला दहशतवाद्यांचा प्लान, विवस्त्र होऊन रोखला विमानातील बॉम्ब ब्लास्ट
कोण आहे विनोद कांबळी?

बीसीसीआयकडून मिळणारे ३० हजार रुपयांचे पेन्शन हेच विनोदचे एकमेव उत्पन्न आहे. बोर्डाकडून मिळणाऱ्या मदतीसाठी तो आभार देखील व्यक्त करतो. विनोदने २०१९ मध्ये मुंबई टी-२० लीगमध्ये एका संघाचे प्रशिक्षक म्हणून काम केले होते. भारताकडून विनोदने २००० साली अखेरचा सामना खेळला होता. मात्र फक्त १७ सामन्यानंतर तो संघाबाहेर झाला. वयाच्या २३व्या वर्षी त्याने अखेरची कसोटी खेळली होती, त्याची सरासरी ५४ होती. मात्र पुन्हा तो संघात येऊ शकला नाही.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times