नवी दिल्ली: केरळमधील मल्लपूरम जिल्ह्यात या गर्भवती हत्तीणीला फटाक्यांनी भरलेले अननस खायला दिले. त्यानंतर हत्तीणीच्या तोंडात फटाके फुटेल आणि तिचा मृत्यू झाला. या घटनेवर संपूर्ण देशातून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. राज्य सरकार बरोबरच केंद्र सरकारने यात लक्ष घातले आहे. क्रीडा क्षेत्रातील खेळाडू यावर हळहळ आणि संताप व्यक्त करत आहेत.

वाचा-
केरळमध्ये जे काही घडले त्याबद्दल मला अतीव दु:ख झाले आहे. प्राण्यांबद्दल लोकांमध्ये ममत्व, प्रेम असायला हवं, असे धक्कादायक प्रकार थांबायला हवेत.” अशी प्रतिक्रिया काल विराट कोहलीने दिली होती. विराटसह भारतीय संघातील जवळ जवळ सर्वच खेळाडूंनी या घटनेचा निषेध केला होता.

वाचा-
भारताची कुस्तीपटू गीता फोगाटने या घटनेवर तीव्र शब्दात प्रतिक्रिया दिली आहे. ही घटना म्हणजे मानव जातीच्या पापांचा घडा भरत असल्याचा पुरावा आहे. संपूर्ण माणूसकीला काळीमा फासणारी घटना असल्याचे गीताने म्हटले.

केरळमधील मलप्पुरम येथे काही निर्दयी लोकांनी गर्भवती हत्तीणीला फटाक्यांनी भरलेला अननस खायला दिला. हत्तीणीच्या तोंडात फटाके फुटले आणि हत्तीणीच्या गर्भाशयात वाढणार्‍या मुलासह तिचा मृत्यू झाला. वनविभागाच्या अधिकाऱ्याने ही वेदनादायक घटना सोशल मीडियावर पोस्ट केली. लवकरच ही छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल झाली आणि लोक चांगलेच संतापले.

वाचा-
अन्नाच्या शोधात ही गर्भवती भुकेलेली हत्तीण जंगलातून बाहेर आली. ती अन्नाच्या शोधात खेड्यात फिरत होती. काही स्थानिक लोकांनी तिला अननसाद्वारे फटाके खायला घातले. भुकेने त्रस्त झालेल्या या हत्तीणीने ते अननस खाल्ले. त्यानंतर तिच्या तोंडात फटाके फुटले आणि मृत्यू झाला.

केरळ पोलिसांनी अज्ञात व्यक्तीच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. राज्याचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी देखील प्रभा हत्तीणीच्या मृत्यूसाठी जे जबाबदार असतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल असे सांगितले. या प्रकाराची गंभीर दखल केंद्र सरकारने घेतली असून दोषींना माफ केले जाणार नाही, असे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटले आहे. प्राण्याला फटाके खायला घालून त्यांना मारणे ही भारतीय संस्कृती नाही, असेही जावडेकर म्हणाले. लवकरच दोषींना हुडकून काढण्याचे काम करण्यात येईल असेही केंद्रीय मंत्री म्हणाले.

कोण काय म्हणाले…

रोहित शर्मा

विजय शंकर

सुनील छेत्री

उमेश यादव

सायना नेहवाल

केएल राहुल

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here