वाचा-
क्रिकेटमधील या चेंडूला या नावाने देखील ओळखले जाते. १९९३ साली इंग्लंडविरुद्ध झालेल्या अॅशेस मालिकेतील ओर्ल्ट्रफर्ड येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात ४ जून रोजी ऑस्ट्रेलियाच्या शेन वॉर्नने इंग्लंडचा फलंदाज माइक गॅटिंगला हा चेंडू टाकला होता. या चेंडूला बॉल ऑफ द सेंच्युरी असे म्हटले जाते. शेन वॉर्नच्या चेंडूने क्रिकेट जगताला आश्चर्यचकित केले होते. शेन वॉर्नचा तो चेंडू ९० डिग्रीत वळला होता आणि थेट विकेटवर गेला.
वाचा-
काही दिवसांपूर्वी क्रिकेटचे बायबल मानल्या जाणाऱ्या विस्डेनने त्यांच्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला होता. हा व्हिडिओ भारतातील असून काही जण क्रिकेट खेळत आहेत. यात गोलंदाज तसाच चेंडू टाकतो जसा १९९३ साली शेन वॉर्नने टाकला होता आणि फलंदाज देखील माइक गॅटिंग प्रमाणे बाद होतो.
वाचा-
क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज आहे. त्याने १४५ कसोटीत ७०८ विकेट, तर १९४ वनडेत २९३ विकेट घेतल्या आहेत. शेन वॉर्नने टाकलेल्या या बॉल ऑफ द सेंच्युरी सामन्यात ऑस्ट्रेलियाने १७९ धावांनी विजय मिळवला होता. वॉर्नने ८ विकेट घेत सामनावीर पुरस्कार पटकावला.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times