बेजबाबदार वक्तव्य करणारा पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर आता चांगलाच अडचणीत आला आहे. कारण आता त्याला राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून समन्स बजावण्यात आले आहे. हे समन्स मिळाल्यावर शोएबला यंत्रणेपुढे सादर व्हावे लागणार आहे, जर शोएबचा प्रश्नांचे योग्य उत्तर देता आले नाही तर त्याच्यावर मोठी कारवाई होऊ शकते.

गेल्या काही दिवसांमध्ये शोएबने काही बेजबाबदारपणे वक्तव्य केली होती. त्यावेळी चाहत्यांनी त्याला ट्रोलही केले होते. पण आता तर त्याची ही वक्तव्य काही जणांनी गंभीरपणे घेतली आहेत. त्यामुळेच आता त्याला राष्ट्रीय तपास यंत्रणेपुढे सादर व्हावे लागणार आहे.

शोएबने आपल्या मुलाखतीमध्ये पाकिस्तान क्रिकेट मंडळ आणि त्यांच्या कायदेशीर सल्लागारांचा अपमान केला आहे. त्यांना बदनाम करायचे काम शोएबने केले आहे, असे म्हणत पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे कायदेशीर सल्लागार तफाझुल रिझवी यांनी अख्तरला नोटीस पाठवली होती. या नोटीशीनंतर शोएब नरमाईची भूमिका घेईल आणि माफी मागेल, असे बऱ्याच जणांना वाटले होते.

आपल्या यु ट्युब चॅनेलवरून शोएबने रिझवी यांच्यावर कोणतेही पुरावे नसताना टीका केली होती. रिझवी यांनी खेळाडूंची कारकिर्द उधळून लावली, असे शोएबने म्हटले होते. त्याचबरोबर पाकिस्तानच्या क्रिकेट मंडळावरही त्याने जोरदार टीका केली होती. पण आता हे प्रकरण थेट तपास यंत्रणेकडे गेल्यामुळे शोएबचे आता काय होणार, याचा विचार चाहते करत आहेत.

एका मुलाखतीमधून शोएबने पीसीबी आणि रिझवी यांच्यावर ताशेरे ओढले होते. त्याचबरोबर या वक्तव्याने त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला होता. आता हे सारे प्रकरण शोएबच्या चांगलेच अंगाशी आले आहे. कारण शोएबवर जर कारवाई करण्यात आली तर त्याला कोर्टाची पायरी चढावी लागू शकते. त्याचबरोबर त्याला काही दंडही भरावा लागू शकतो. हा दंड कोट्यावधी रुपयांमध्ये असू शकतो, असेही म्हटले जात आहे. त्यामुळे शोएब चांगलाच अचडणीत सापडलेला आहे. आता शोएब या सर्व गोष्टींना कसा सामोरा जातो आणि आ़पली बाजू कशी मांडतो, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलेले आहे.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here