करोना व्हायरसमुळे ठप्प झालेले जग आता हळूहळू सुरळीत व्हायला सुरु झालं आहे. भारतामध्येही आता लॉकडाऊन संपला आहे. त्यामुळे आता ट्वेन्टी-२० लीगही सुरु होण्याच्या मार्गावर आहे. क्रिकेट चाहत्यांसाठी सध्याच्या घडीला एक खूष खबर आली आहे. शनिवारपासून ट्वेन्टी-२० स्पर्धा सुरु होणार आहे. या स्पर्धेला चाहत्यांनाही आता उपस्थिती लावता येणार आहे. ही स्पर्धा ६ जूनपासून सुरु होणार आहे.

सर्व प्रथम वेस्ट इंडिजमध्ये क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले होते. ही स्पर्धा यशस्वीपणे पार पडली. त्यानंतर आता ट्वेन्टी-२० स्पर्धेला या शनिवारपासून सुरुवात करण्यात येणार आहे. ही स्पर्धा आता चाहत्यांना स्टेडियममध्ये जाऊन पाहता येणार आहे.

करोना व्हायरसमुळे बंद स्टेडियमध्येच सामने खेळवावे, अशी मागणू जोर धरू लागली होती. पण जर स्टेडियममध्ये प्रेक्षक नसतील तर सामना खेळायलाही मजा येणार नाही, असे भारताचा कर्णधार विराट कोहलीसर काही आजी-माजी खेळाडूंनी सांगितले होते. त्यामुळे आता या गोष्टीवरही विचार करण्यात आला असून आता चाहत्यांना स्टेडियममध्ये जाऊन सामना पाहता येणार आहे.

कशी असेल ही ट्वेन्टी-२० स्पर्धा ही स्पर्धा आठ संघांमध्ये खेळवण्यात येणार आहे. ही स्पर्धा तीन दिवसांची असेल आणि या तीन दिवसांमध्ये पंधरा सामने खेळवले जातील. हे सामने तीन विविध स्टेडियममध्ये सकाळी १० आणि दुपारी २.३० मिनिटांनी सुरु होतील.

किती चाहत्यांना मिळणार प्रवेशसध्याच्या घडीला करोना व्हायरसचा धोका अजूनही टळलेला नाही. त्यामुळे स्डेडियम हाऊसफुल करण्यात येणार नाही. स्टेडियममध्येही यावेळी चाहत्यांमध्ये ठराविक अंतर ठेवण्यात येणार आहे. एका सामन्याला ५०० प्रेक्षकांची उपस्थिती स्डेडियममध्ये असेल.

कुठे होणार हे सामनेऑस्ट्रेलियामध्ये या शनिवारपासून हे सामने होणार आहेत. डार्विन प्रीमिअर ग्रेड क्लबमधील सात आणि एका आमंत्रित संघांमध्ये ही स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेचे थेट प्रक्षेपणही करण्यात येणार आहे. या स्पर्धेला आता कसा प्रतिसाद मिळतो आणि सुरक्षितपणे स्पर्धा कशी खेळवली जाते, हे पाहिल्यावर ऑस्ट्रेलियामधील विश्वचषकाबाबत विचार होऊ शकतो.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here