नवी दिल्ली: करोना व्हायरस लॉकडाऊनमुळे सर्वांना घरी थांबावे लागले. काम बंद असल्यामुळे अनेकांचे उत्पन्न थांबले. पण याला अपवाद ठरले ते काही खेळाडू. लॉकडाऊनच्या काळात घरी बसून काही खेळाडूंना कोटींमध्ये कमाई केली आहे. इस्टाग्रामवर पोस्ट करून सर्वाधिक पैसे मिळवणाऱ्या खेळाडूंची यादी जाहीर झाली असून टॉप १० मध्ये फक्त एका भारतीय खेळाडूचा समावेश आहे. यातील एकमेव खेळाडू म्हणजे भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार असून त्याने फक्त ३ पोस्ट करून तब्बल ३.६ कोटी रुपायची कमाई केली.

वाचा-
लॉकडाऊनमुळे अनेकांचा रोजगार केला. लॉकडाऊनमुळे काही जणांना पगार कपातीचा सामना करावा लागला. अशा आर्थिक संकटात भारतीय संघाच्या कर्णधाराने घरी बसून ३.६ कोटी रुपये कमावले आणि यासाठी फक्त त्याने सोशल मीडियावर ३ पोस्ट केल्या.

लॉकडाऊनच्या काळात इस्टाग्रामवर पोस्ट करून विराटने कोटी कमावले असेल तरी सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तो सहाव्या स्थानावर आहे. लॉकडाऊनच्या काळात विराटने तीन पेड पोस्ट केल्या. यातील प्रत्येक पोस्टसाठी त्याला १.२ कोटी रुपये मिळाले. विराटचे इस्टाग्रामवर ६.२ कोटी फॉलोअर्स आहेत.

या यादीत आघाडीवर आहे तो पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू ख्रिस्टियानो रोनाल्डो. त्याने २१ मार्च ते १४ या कालावधीत १७.९ कोटी इतकी कमाई केली. रोनाल्डोचे २२.२ कोटी फॉलोअर्स आहेत. इस्टाग्रामवर सर्वाधिक फॉलअर्सच्या यादीत रोनाल्डो अव्वल स्थानी आहे. कमाईबाबत दुसऱ्या स्थानावर आहे तो अर्जेंटिनाचा फुटबॉलपटू लियोनेल मेसी. १५.१ कोटी फॉलअर्स असलेल्या मेसीने ४ पोस्ट करून १२.३ कोटी रुपये कमावलेत. तर ब्राझीलचा स्टार खेळाडू ज्युनिअर नेमारने तिसऱ्या स्थानावर असून त्याने ४ पोस्टसह ११.४ कोटी कमाई केली.

एनबीएचा स्टार शकील ओनीलचे इस्टाग्रामवर १.७ कोटी इतके फॉलोअर्स असून त्याने १६ पोस्ट करून ५.५ कोटी रुपये कमावलेत. लॉकडाऊनच्या काळात सर्वाधिक कमाई करणाऱ्या टॉप ५ खेळाडूंमध्ये तो एकमेव बास्केटबॉलपटू आहे. इंग्लंडचा माजी फुटबॉलपटू डेव्हिड बेकहमचा जलवा अद्याप दिसतो. त्याने फक्त ३ पोस्ट करून ३.८ कोटी रुपये कमावले. बेकहमचे इस्टाग्रामवर ६.३ कोटी फॉलोअर्स असतील. तो पाचव्या यादीत पाचव्या स्थानावर आहे.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here